लायन्स क्लब ऑफ नागपूर 7 स्टारतर्फे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर
कॅन्सर, फिजिओथेरपी, दंत, नेत्र व टीबी तपासणीसह मोफत औषधांचे वाटप; १८० हून अधिक नागरिकांचा लाभ
नागपूर : - लायन्स क्लब ऑफ नागपूर 7 स्टार आणि ग्लोबल ऑन्कोकेअर कन्सल्टंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने लँडमार्क बिल्डिंग (बिग बाजार) येथे बहुविशेषज्ञता असलेल्या मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले. अमेरिकन ऑन्कोलॉजीच्या डॉ. कमलजीत कौर यांनी अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून महिलांची स्तनाच्या कर्करोगासाठी (ब्रेस्ट कॅन्सर) तसेच पुरुषांची तोंडाच्या कर्करोगासाठी (ओरल कॅन्सर) तपासणी केली.
यासोबतच डॉ. रोशन, डॉ. हर्षल आणि डॉ. समृद्धी यांनी फिजिओथेरपी विभागात रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले. सुश्री नेहा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली दंत तपासणी करण्यात आली.
नेत्र तपासणीसाठी डॉ. चंद्रकांत बोपचे यांच्या टीमने, डॉ. खोब्रागडे सर आणि LMHच्या सुश्री अंजना मडावी यांच्या सहकार्याने नागरिकांची नेत्र तपासणी केली. तसेच एम्स (AIIMS) यांच्या सहकार्याने पॅथॉलॉजी टीमने टीबी तपासणीसह एक्स-रेची सुविधाही उपलब्ध करून दिली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी एम्सचे डॉ. अरविंद यांनी विशेष परिश्रम घेतले. तपासणीनंतर गरज असलेल्या नागरिकांना श्री. ऐजाज यांच्या टीमतर्फे मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा १८० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. विविध आजारांची प्राथमिक तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि औषधोपचाराची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक श्री. दिनेश दुआ, श्री. आशिष दुरुगकर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे बहुविशेषज्ञता असलेले आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time