हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची जागेची मागणी करणारे नेते गहाळ
राज्य सरकार
गोर-गरीबांचे कां उद्योगपतींचे , चर्चेला उधाण
लोकप्रतिनिधी च्या
दुर्लक्षित धोरणांने तालुक्यातील शहरांचे भविष्य अंधारात
कन्हान - नागपुर हिवाळी अधिवेशना च्या वेळी कन्हान-पिपरी
नगर परिषद च्या समोर कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर
लिमिटेड कंपनीची १८.७८ एकड भुखंडाची मागणी करिता सर्व पक्षीय नागरिकांनी , कृती समिती व व्यापारी संघटने च्या वतीने
माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरु केले होते .
अधिवेशना च्या कार्यकाळा पासून तर शेवटच्या दिवसापर्यंत पर्यंत साखळी उपोषण सुरु
होते. परंतु नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.देवेंद्र फडणवीस , खासदार कृपाल तुमाने , आमदार आशिष जयस्वाल , नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर यांनी उपोषण
स्थळी भेट न दिल्याने हे राज्य सरकार , प्रशासन आणि संबंधित अधिकारी , गोर - गरीब व्यावसायिकांचे की मोठ मोठे उद्योगपतीं चे अशा चर्चेला उधाण आले
आहे .
कन्हान शहरातील
राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या मालकीची संपुर्ण १८.७८ एकड
भुखंड ग्रोमोर वेंचर्स ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण
विकास कार्य आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाले आहे .सर्व पक्षीय नागरिक
कृती समिती व व्यापारी संघटने द्वारे कन्हान - पिपरी नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन
व साखळी उपोषण केले मात्र अद्याप कुठला शासन प्रशासना कडून निर्णय लागला नाही .
मागील अनेक वर्षांपासून
विविध सामाजिक संघटने च्या पदाधिकार्यांनी नगरपरिषद निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर
लिमिटेड कंपनी च्या जमीनीवर मार्केट यार्ड , हॉकर्स झोन , साप्ताहिक व गुजरी बाजार , भाजीपाला विक्रेता दुकानदार , बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता
उपयोगात घेण्याची मागणी केली होती .
परंतु नगर परिषद प्रशासना ने सदर विषयाकडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन ग्रोमोर वेंचर्स ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्या वर प्रश्न निर्माण झाले. यातच समोर फुटपाथ वर लागलेले गोर गरिबांची दुकाने हटविण्याची चर्चा असुन त्याचा परिवारा वर भुखमारी येण्याची शक्यता नाकारता येत नसुन नगर परिषद प्रशासन या दुकानदारांच घर चालविणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंदुस्तान लिव्हर
लिमिटेड कंपनी ची जागा शहराच्या सर्वांगीण विकासा आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करण्या
करिता अति आवश्यक असल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटने च्या
पदाधिकार्यांनी माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाची
भुमिका घेतली होती . परंतु साखळी उपोषण होऊन एक महिना झाला असुन आंदोलन कर्ते कुठे
लपुन बसले. फक्त आंदोलन फोटो सेशन, फेसबुक, सोशल मीडिया साठी
होते का छोटे मोठे व्यापारांना , नागरिकांना दिखावा साठी आंदोलन होते का अशा उलट सुलट चर्चा शहरात रंगत आहे .
इतकेच नव्हे तर हिंदुस्तान लिव्हर कंपनी ची जागा नगर परिषद प्रशासनच्या हाता मधून
गेल्याने शहरातील भविष्य अंधारात व धोक्यात आले आहे.
सर्व पक्षीय
नागरिक कृती समिती व व्यापारी संघटना माजी आमदार डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या
नेतृत्वात हिंदुस्तान लिव्हर कंपनी जागेची
मागणी साठी आंदोलनाची भुमिका घेतली. व्यापारांना जागा मिळणार अशी आशा होती परंतु
हे पदाधिकारी लपुन बसल्याने व्यापारांनी कस जागावे आणि कुठल्या जनप्रतिनिधि कडे जावे असा चिंतेचा
विषय बनला आहे .
The leader of Hindustan Liver Limited Company who demanded the seat is missing

0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time