मोहाफुलाची दारु वाहतुक करीत असताना बाबुळवाडा येथे पकडले | Mohafula was caught while transporting liquor at Babulwada
पारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील बाबुळवाडा येथे पारशिवनीचे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शना मध्ये दारू पकडण्यात आली.
दिनांक १०/७/२०२४ ला रात्री नवं ते दहा वाजे च्या दरम्यान मोहा फुलांची गावठी हात भटटीची दारु जंगला मधुन वाहतूक होत असल्याचे आढळून आले.असता मारुती सुझुकी झेन गाडी क्रमांक एम.एच-३१-सी.एन.-६६०१ची झडती घेतली असता त्या मध्ये दारु चार प्लास्टिक टियुब मध्ये आढडुन आली.
त्यामध्ये प्रतेक टियुब मध्ये ७० लीटर प्रमाणे २८० लीटर तीची प्रती लीटर ५० रुपये प्रमाणे १४००० रुपये किंमतीची दारु मिळाली असुन गाडी ची किंमत १००,००० रुपये असुन अशा एकुण माल १,१४,००० रुपयांचा मुद्देमाल पकडुन जप्त करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली.
हि कार्यवाही पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शना मध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भताने यांनी आरोपी करण उकडराव मसराम वय १९ वर्ष राहणार सावनेर,सनकिशनलाल तुळशिराम तुमडाम वय२८ वर्षे राहणार शिलादेवी तहसिल पारशिवनी यांच्या वरती कार्यवाही करुन अटक करण्यात आली.
हि कार्यवाही राजेश कुमार थोरात, उपनिरीक्षक शिवाजी भताने, साहाय्यक फोजदार देवानंद उके बोंद्रे, पोलीस हवालदार गजानन उके बोंद्रे, पोलीस अंमलदार विरेंद्र सिंग चौधरी, राकेश बाधाटे,पुथवीराज चव्हाण,चालक साहाय्यक फोजदार संदिप बेलेकर यांनी केली.असुन फिर्यादी पि.एस.आय.भताने पोलीस उपनिरीक्षक यांनी केले.
प्रतिनिधी : सतीश साकोरे पारशिवनी

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time