सार्वजनिक वाचनालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी
ग्रंथप्रदर्शनी व ग्रंथवाचन उपक्रमातून वाचन प्रेरणा दिन साजरा; मान्यवरांसह वाचक व सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कन्हान : - सार्वजनिक वाचनालय, हनुमान नगर, कन्हान येथे गुरुवार (दि.१५) ऑक्टोबर रोजी भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथप्रदर्शनी व ग्रंथवाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वासुदेवराव चिकटे यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती मध्ये एन. के. खानझोडे आणि गंगाधरराव अवचट प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच वाचनालयाचे सभासद, वाचक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दिनकरराव मसके यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान, त्यांचे प्रेरणादायी विचार आणि विद्यार्थ्यांना दिलेला संदेश याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथप्रदर्शनी आणि ग्रंथवाचन कार्यक्रमाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची व्याप्ती वाढविणे आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी संजय आगलावे, स्वप्नील भेलावे, अभिषेक निमजे, हर्षल मस्के, तन्मय मोटघरे, आभास सहारे, श्रेयश कुंभलकर, खुशाल धांडे, कु. आशिता लोंढे, आकांक्षा बरीये, कोमल उके, पलक तेलुते, प्रणाली कावडे, प्राची वकलकर, पुष्पा बरलेवार, सौ. अलका कोल्हे, कु. विधी कुंभलकर यांच्यासह वाचनालयाचे सभासद व वाचक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन दिनकरराव मस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपहार, मिठाई व फळांचे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कन्हान के सार्वजनिक वाचनालय में डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम की ९५वीं जयंती 'वाचन प्रेरणा दिन' के रूप में उत्साहपूर्वक मनाई गई। इस दौरान ग्रंथप्रदर्शनी और ग्रंथवाचन उपक्रम का आयोजन किया गया।
सह संपादक - ऋषभ बावनकर
डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान
Kanhan library news
Vachan Prerna Din celebration
Dr APJ Abdul Kalam birth anniversary Nagpur



Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time