वाघधरे वाडी येथील ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; आईची पोलीस ठाण्यात तक्रार

Akash Nade missing news
Akash Nade missing

वाघधरे वाडी येथील ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; आईची पोलीस ठाण्यात तक्रार


कन्हान : - कन्हान परिसरातील वाघधरे वाडी येथील ३२ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने कन्हान पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आकाश मिलिंद नाडे असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, त्याचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मिळालेल्या तक्रारीनुसार, आकाश नाडे हा ऑटो चालविण्याचे काम करतो. गुरुवार (दि.१) ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा घरी परतल्यामुळे त्याचे आईसोबत वाद झाले होते. त्यानंतर दोघेही झोपले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि.२) ऑक्टोबर रोजी सकाळी आकाश उठून चहा पिऊन घरी बसला होता. त्यानंतर तो ऑटोची चावी आणि मोबाईल घेऊन बाहेर जात असल्याचे सांगून निघून गेला. मात्र, बराच वेळ होऊनही आकाश घरी परतला नाही. नातेवाइकांनी तसेच कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नसल्याने त्याच्या आईने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

बेपत्ता तरुणाचे वर्णन : आकाश नाडे याचे वय ३२ वर्षे असून उंची सुमारे १७० सेंटीमीटर आहे. त्याची बांधा मजबूत असून रंग गोरा आहे. त्याने पांढऱ्या रंगाची पँट आणि पिवळ्या रंगाची फुले असलेला फुल बाह्यांचा शर्ट परिधान केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याच्या हातात चांदीच्या अंगठ्या असल्याचेही सांगण्यात आले आहे. आकाशबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आव्हाहन परिवारा कडुन करण्यात आले आहे.

सह संपादक - ऋषभ बावनकर


#MissingPerson
#KanhanNews
#NagpurPolice
#AkashNade
#WaghdhareWadi
#CrimeNewsMaharashtra
#MarathiNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या