राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांच्या हस्ते योगिता भालवी यांचा सत्कार


राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांच्या हस्ते योगिता भालवी यांचा सत्कार


उमरेड : - भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, नागपूर जिल्हा (रामटेक) यांच्या वतीने नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सौ. माया ताई इवनाते यांच्या मंगळवार (दि.३०) जुन रोजी सत्कार सोहळ्याचे आयोजन उमरेड येथील सत्यम हॉलमध्ये करण्यात आले .


यावेळी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार सौ. माया ताई इवनाते यांच्या हस्ते योगिता भालवी (तडसे), नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती, नगर परिषद कन्हान व नागपुर जिल्हा (रामटेक क्षेत्र) महिला आघाडी उपाध्यक्ष यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रीती मनमोडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार सौ. माया ताई इवनाते उपस्थित होत्या. कार्यक्रमास भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सत्काराबद्दल योगिता भालवी यांनी आयोजकांचे तसेच पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, भविष्यातही महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि जनसेवेसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या