६ ठिकाणी जुगार अड्यावर धाड , कन्हान पोलीसांची मोठी कारवाई
३७ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , ८,०३,६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान : - कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात ६ ठिकाणी सुरु असलेल्या अवैध जुगार अड्यावर कन्हान पोलीसांनी धाड टाकुन ३७ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ८,०३,६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . कन्हान पोलीसांच्या मोठ्या कारवाई मुळे जुगार खेळणाऱ्यांचे दाबे दणाणले आहे .
Raids on gambling dens at 6 places, major action by Kanhan police
तान्हा पोळ्याचा दिवशी पाच ठिकाणी कारवाई
कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात शनिवार (दि.२३) आॅगस्ट तान्हा पोळ्याचा दिवशी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता . कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे स्टाफ सह परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि कन्हान स्वामी विवेकानंद नगर परिसर , खंडाळा (घटाटे) , खेडी , वाघोली , खंडाळा परिसरात काही इसम बावन ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे .
पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी दखल घेत सहायक पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षक , डीबी पथकाला योग्य मार्गदर्शन करुन कारवाई चे आदेश दिले . पोलीसांनी ५ ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकुन आरोपी कल्पेश सोनटक्के , प्रकाश गोंडाने , योगेश चकोले , शेषराव मारबते , दिलीप शिवरकर सर्व रा.स्वामी विवेकानंद नगर कन्हान आणि दशरथ कापसे रा.कामठी , दादाराम नागपुरे , ताराचंद नागपुरे , रामकृष्ण नागपुरे सर्व रा.खंडाळा घटाटे , मंगेश कडु , प्रमोद मरसकोल्हे , सुनील ठाकरे , शुभम घराडे , निकेश तिजारे सर्व रा.खेडी , अमोल बावने रा.खंडाळा घटाटे , सिध्दार्थ मेश्राम रा.बिजापुर खंडाळा , मनोज उमाडे , उमेश कैथवास दोन्ही रा.वाघोली यांना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ४४,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
राज फार्म हाउस येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड
रविवार (दि.२४) आॅगस्ट रोजी कन्हान पोलीसांना गुप्त माहिती मिळाली कि जुनी कामठी , गाडेघाट रोडवरील राज फार्म हाउस येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांवर पैसे लाऊन हार जीतचा जुगाराचा खेळ खेळीत आहे . उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर , पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड , उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , पोलीस हवालदार जयलाल सहारे , अश्विन गजभिए , जीवन विघे , आशिष बोरकर यांनी जुनी कामठी गाडेघाट रोडवरील राज फार्म हाउस येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर धाड टाकुन आरोपी रामचंद्र उमाटे , दशरथ उमाटे , रोशन सोनकुसरे , केशव आस्वले , विकास धकाते , निशांत हेडाऊ , अनिल अरजे , विजय सातपुते , अजय भिसीकर , रोशन कुंभारे , शशांत परते , अभिषेक खवास , शुभम सातपुते , गौरव बोकडे , विनय सातपुते ,चंदन सातपुते , सौरभ गुडडे , हेमराज सातपुते यांना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ७,५८,७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time