कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर अग्रवाल ले आऊट परिसरात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडुन ७१,१०० रुपयांच्या मुद्देमाल चोरुन नेल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
सोमवार (दि.४) आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मुलगा यश याच्या पासपोर्ट बनविण्याकरिता नरेश भीमराव डहाटे (५२) रा.कन्हान पत्नी व मुलगा यश सोबत नागपुर येथे गेले होते . सायंकाळी ५:३० वाजता च्या दरम्यान नागपुर वरून घरी परत आले . घराचा दाराकडे लक्ष गेले असता दरवाजा कुलूप तोडुन हॉलमधील बेडवर ठेवलेले दिसले .
कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडुन आतमध्ये प्रवेश करून लोखंडी गोदरेजचे कपाटामधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे ४७ ग्रॅम आणि चांदिचे ९ ग्रॅम दागिने असा एकुण ७१,१०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी नरेश डहाटे यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time