लोखंडी तराफे चोरणारा युवक पोलीसांच्या जाळ्यात

लोखंडी तराफे चोरणारा युवक पोलीसांच्या जाळ्यात

एक पसार , वाहनासह बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान : - कन्हान शहरातील आंबेडकर चौक येथे पोलीसांनी दोन लोखंडी तराफे चोरणारा युवकाला पकडले . एक युवक पोलीसांची वाहन पाहुण पळुन गेल्याने पोलीसांनी बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला .

शनिवार ते रविवार च्या मध्यरात्री १:३० वाजता दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर स्टापसह परिसरात रात्रग्रस्त पेट्रोलिंग करित असतांना आंबेडकर चौक येथे दोन युवक पॅशन प्रो दुचाकी वाहन क्र.एम एच ४० एस आर १७९५ ने दिसुन आले . पोलीसांना पाहुण एक युवक पळुन गेला . संशय आल्याने पोलीसांनी तुळशीराम मंगल पाटील (२०) रा. कन्हान याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली . समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलीसांना चोरी अथवा लबाडीने आणल्याचा दाट संशय झाला . पोलीसांनी युवकाच्या ताब्यातुन दोन लोखंडी तराफे किंमत अंदाजे २००० रुपये आणि दुचाकी वाहन किंमत अंदाजे १०,००० रुपये असा एकुण १२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी तुळशीराम पाटील आणि पसार आरोपी शैलेन्द्र भोयर रा.कन्हान याचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या