स्कॉर्पिओ वाहनाची ट्रक ला मागुन धडक , एकाचा मृत्यु |


स्कॉर्पिओ वाहनाची ट्रक ला मागुन धडक , एकाचा मृत्यु

तीन जख्मी , दोन वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल 

Scorpio vehicle hits truck from behind, one dead

कन्हान : - कन्हान शहरातील तारसा रोड एमजी नगर वाघधरे वाडी परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने मागून ट्रकला जोरदार धडक दिली . या धडकेत एकाचा मृत्यू झाला असुन तीन जख्मी झाल्याने पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


शनिवार (दि.२३) आॅगस्ट रोजी  सायंकाळी तान्हा पोळा सणा निमित्त चेतन किशोर वाडीभस्मे (२५) , प्रज्वल रविंद्र चौहान (२५) , प्रणय महादेव कडु (२५) वर्ष , प्रियांशु कचरुलाल बावणे (२१) , आकाश मुलचंद सोनेकर (२५) , रितीक मारोती चरडे (२३) , रितीक आंनदरान गडे (२१) सर्व रा.निमखेडा आणि प्रणय घोडेश्वर रा.बोथली असे  मिळुन प्रणय कडु यांचा महिंद्रा स्कारपिओ चारचाकी वाहन क्रमांक एम एच ४२ के ८४६९  ने निमखेडा येथुन सिंदी रेल्वे जि. वर्धा येथे तान्हा पोळा पाहायला गेले होते . 


रविवार (दि.२४) आॅगस्ट रोजी रात्री सिंदी रेल्वे येथुन तान्हा पोळा पाहून स्कारपिओ वाहनाने 

निमखेडा येथे परत येण्याकरिता निघाले . प्रणय कडु हा वाहन चालवित असुन चालकाचा बाजुला प्रज्वल चौव्हान बसला होता आणि बाकी सर्व मागे बसले होते . पहाटे रात्री १:३० ते २ वाजता च्या दरम्यान नागपुर - जबलपुर रोडने बोर्डा टोल नाका वाचविण्यासाठी तारसा रोड मार्गाने कन्हान कडे येत असतांना एम जी नगर वाघधरे वाडी येथे रोडाच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच ४० बीजी ०३७८ ला मागुन स्कारपिओ वाहन चालक प्रणय कडु याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन जोरदार धडक दिली . धडकेत प्रज्वल चौव्हान याचा गळ्याला गंभीर मार लागुन जख्मी झाला आणि प्रणय घोडेस्वार , आकाश सोनेकर , पियुष बावने जख्मी झाले . 

सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , सम्राट वनप्रती स्टाफ सह घटनास्थळी दाखल झाले . जख्मींना उपाचारा साठी आशा हाॅस्पीटल कामठी येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी प्रज्वल चौव्हान याला तपासुन मृत घोषित केले . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी चेतन वाडीभस्मे यांचा तक्रारी वरून आरोपी स्कारपिओ वाहन चालक प्रणय कडु आणि ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर करीत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या