वाघाने घेतला शेतकऱ्यांचा बळी
पारशिवनी:- तालुक्यातील आमगाव शिवारात दिनांक १२/१/२०२५ रविवार ला सायंकाळी पाच वाजे च्या सुमारास शेतकरी महादेव नत्थु सुर्यवंशी वय ४३ वर्ष यांच्या वरती वाघाने जिवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्या मध्ये शेतकऱ्यांचा मूत्यु झाला पारशिवनी वनपरिक्षेत्रातील आमगाव गावातील शेतकरी तुरीची कापनी करीत असताना लपून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यांवर हल्ला त्यात शेतकऱ्यांचा मूत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आपल्या कर्मचाऱ्यांनसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पारशिवनी पोलीस स्टेशन चे थानेदार राजेश कुमार थोरात शुद्धा आपल्या पोलीस ताफ्या सह घटनास्थळी दाखल झाले.पारशिवनी तालुक्यांमध्ये ग्रामीण मध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाघाची दहशत वाढल्या मुळे व गाव पाळीव प्राण्यांची शिकार करून आज पर्यंत आपल्या पोटाची खळगी भरणाया वाघाने आता मानसाला आता आपले भक्ष्यक केले आहे. त्या मुळे या परिसरातील शेतकरी, शेतमजूर हे दहशतीत आलेले आहेत दोन दिवसा आधि साल ई गावातील शेतकऱ्यांच्या गाई ला वाघाने ठार केले तर काही महिन्यां अगोदर एका शेतकऱ्याला वाघाने जबरदस्त जख्मी केले होते.
पण आजच्या घटनेत वाघाने शेतकरी सुर्यवंशी यांच्या नडीचा घोट घेतला आता वाघ हा नरभक्षी झालेला असल्यामुळे सदर वाघांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करण्याकरिता वनविभागाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी शेतकरी व जेष्ठ पत्रकार भुजंगराव ढोरे व आमगाव येथिल जनतेनी केलेली असुन तसेच दिनांक १०/१२/२०२४ ला येथिल रहिवासी हिरामण गोविंदा नखाते यांची गाय मारली तेव्हा पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि प्रशांत सावरकर यांनी मोकका चौकशी करून पुढाकार न्युज चायनल ला बातमी प्रकाशित केली असतां वन विभागाला जाग आलेला नव्हता तेव्हा च यांनी लक्ष दिले असते तर हि वेळ आली नसती एवढेच नाही तर येथिल शिवारा मध्ये वाघाला लपुन बसण्या करीता पुष्कळ जागा असल्यामुळे येथे घटना वाढण्याची शक्यता असल्यामुळे
संतप्त नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन:- नागरीकानी रात्री महादेव चा मूतदेह पारशिवनी - पेंच मार्गावर आनंला मुरुतया च्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी.कुटुबातील एकाला नौकरी द्या.त्या वाघाचा कायम स्वरुपी बंदोबस्त करा आणि जंगलाला कुंपण घाला अशी मागणी त्यांनी रेटुन धरत रास्ता रोको केला,जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाही.तो पर्यंत मुतालाहात लावु देणार नाही.अशी आग्रही भुमीका त्यांनी घेतली होती.
दोन मागण्या मान्य:- मुताच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचे धनादेश सोमवारी सकाळी देण्यात आला असून उर्वरीत १५ लाख रुपये आठवड्या भरात टप्प्याने दिले जातील शिवाय कुटुंबातील एका व्यक्तीला कंत्राटी नौकरी देण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांनी दिल्याने नागरीक थोडे शांत झाले उर्वरित तीन मागण्यांवर चर्चा करण्याकरीता आमगाव ग्राम पंचायत मध्ये सोमवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती.
तसेच पारशिवनी तालुका प्रतिनिधी यांनी अनील भगत वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक, पारशिवनी यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले की आमगाव येथे वाघा करीता बंदोबस्त लावण्यात आलेला असुन तार कम्पाऊट करीता केंद्राकडे प्रस्ताव पाठविलयाची माहिती प्राप्त झाली आहे.
सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time