जि. प्रा.शाळा गोर्लेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


जि. प्रा.शाळा गोर्लेगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


२६ जानेवारी १९५० रोजी भारताची जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आमलात आली. आणि लोकशाहीचा स्वीकार करून खऱ्या अर्थाने त्या दिवशी भारत प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशांमध्ये विविध ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या नमित्ताने दि 05 फेब्रुवारी 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांचा विकास व्हावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

   

   सर्वप्रथम स्त्री  शिक्षणाची जननी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस नवनिर्वाचित सरपंचा सौ. अनिता तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व शिक्षक वृंद यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रतिष्ठित व सन्माननीय व्यक्ती यांचा सत्कार करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यास मदत होत असते. नृत्याच्या माध्यमातून आपल्या अंगातील कला आणि नाटके व भाषणांच्या माध्यमातून आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळते.

   श्री गणेशाच्या नृत्याच्या माध्यमातून श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वा स सुरुवात करण्यात आली. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालगीतांवर हटके ठुमके देत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.  

     संपूर्ण कार्यक्रमादरम्यान चित्रपट व देशभक्तीपर गीतांवर उत्कृष्ट असे नृत्य सादरीकरण जिल्हा परिषद शाळा गोरलेगाव येथील विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. प्रेक्षकांकडून आज झालेल्या संस्कृती कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी सादर केलेले गीत पोवाडे व नृत्य यांकरिता त्यांचे कौतुक सुद्धा करण्यात आले. शेवटी समस्त ग्राम वासीयांतर्फे शाळेचे मुख्याध्यापक  व सर्व शिक्षक वृंदांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी स्वागत व जाहीर आभार मानण्यात आले.

  कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक , तांबरे सर, वनशेट्टे मॅडम, झाडे मॅडम व सर्व शिक्षक , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री शामरावजी चव्हाण, उपसरपंच प्रभाकर पाटील, गजानन चव्हाण पोलीस पाटील गोर्लेगाव, शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष व सदस्य, रामदास चव्हाण, नारायण उत्तमराव चव्हाण,  लक्ष्मण शिंदे, पत्रकार तुकाराम चव्हाण, संभाजी चव्हाण, राजू चव्हाण सर,   देवानंद चव्हाण, बाळू गायकवाड, अब्दुल पठाण आदी सर्वांनी परिश्रम घेतले.

तुकाराम चव्हाण-नांदेड


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या