विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती टिकविण्यासाठी नवोपक्रमाला चालना द्या


विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती टिकविण्यासाठी नवोपक्रमाला चालना द्या


गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांचे आवाहन


नवोपक्रमातूनच आनंददायी शिक्षणाची संकल्पना


अभिनंदन विद्यार्थी... I am a shining star हा जिल्ह्य़ात नव्हे तर राज्यासाठी पथदर्शक उपक्रम


कन्हान : - प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे व गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे . यावर मात करण्यासाठी धर्मराज प्राथमिक शाळेने महिन्याची १०० % उपस्थितीसाठी अभिनंदन विद्यार्थी I am a shining star हा उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण केली आहे . हा जिल्ह्य़ातच नव्हे तर राज्यासाठी मार्गदर्शक उपक्रम असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी श्री सुभाष जाधव यांनी व्यक्त केले.


धर्मराज प्राथमिक शाळेत दैनंदिन विद्यार्थी उपस्थिती वाढीसाठी व गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या संकल्पनेतून "अभिनंदन विद्यार्थी... I am a shining star" हा अनोखा उपक्रम जुलै महिन्यापासून राबविण्यात येत आहे . या उपक्रमाच्या अनावरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी सुभाष जाधव उपस्थित होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष खुशालराव पाहुणे , गटशिक्षणाधिकारी सुनील कोडापे , उपक्रम प्रमुख मुख्याध्यापक खिमेश बढिये , शिक्षक नेते मिलिंद वानखेडे , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रकाश डुकरे , उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. हरिष पोटभरे उपस्थित होते .


अभिनंदन विद्यार्थी .... I am a shining star या उपक्रमांच्या लोगोचे अनावरण

खुशालरावजी पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी करुन राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे नमूद केले . विद्यार्थी नियमितपणे शाळेत आला तरच शिक्षणाचा प्रवाह गतीमान करुन शकतो , या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले . महिन्यातील शैक्षणिक कामाच्या दिवसाएवढी म्हणजेच १०० % उपस्थितीसाठी अभिनंदन विद्यार्थी हा लोगो देऊन त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगितले . यावेळी जुलै महिन्यातील ५५२ विद्यार्थ्यांपैकी ७९ विद्यार्थ्यांचा  १००% उपस्थितीसाठी लोगो लावून सत्कार करण्यात आला .


यावेळी शिक्षक नेते मिलिंद वानखेडे व गटशिक्षणाधिकारी सुनील कोडापे यांनी मार्गदर्शन करतांना नव्या संकल्पना घेऊन शाळा विद्यार्थी हितार्थ व शैक्षणिक विकासासाठी विविध योजना धर्मराज प्राथमिक शाळा राबविते . हे उपक्रम जिल्हा व राज्य सरकारच्या दप्तरी निश्चितच नोंद घेणारे असून इतर शाळांसाठी पथदर्शक आहे . यावेळी सर्व पाहुण्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे संचालन गणेश खोब्रागडे यांनी तर उपस्थितांचे आभार भिमराव शिंदेमेश्राम यांनी मानले .


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर जिभकाटे , राजू भस्मे , भिमराव शिंदेमेश्राम , कु.अपर्णा बावनकुळे , कु. प्रिती सुरजबंसी , गणेश खोब्रागडे , कु.शारदा समरीत , सौ.चित्रलेखा धानफोले , अमित मेंघरे , कु. हर्षकला चुधरी , कु.पूजा धांडे , कु.उत्तरा बन्सोड , दिनेश ढगे , नरेंद्र कडवे , सतीश राऊत , श्री गणराज , माला जिभकाटे , कोकीळा सेलोकर , सरीता बावनकुळे , प्रियांका साठवणे , श्रीमती आरेकर , महादेव मुंजेवार यांनी सहकार्य केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या