१३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार , नराधमाला अटक
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील नागपुर - जबलपुर महामार्ग वर न्यु मान हाॅटेल येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीला दुचाकी वाहना वर नेऊन शारीरिक संबंध करुन अत्याचार केल्याने पोलीसांनी नराधमाला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे .
अल्पवयीन मुलगी १३ वर्षाची असुन कामठी येथील रहिवासी आहे आणि शिकत आहे .
आरोपी एहतेशाम आलम वल्द शमीम अक्तर (२१ वर्ष) रा.आझाद नगर ड्रॅगन पॅलेस कामठी याने अल्पवयीन मुलीशी (दि.१) जुलै रोजी इंन्स्टाग्राम वर मेत्री केली . आरोपी ने (दि.०३) आॅगस्ट रोजी मुलीला कामठी येथुन दुचाकी वाहनावर बसवुन कन्हान परिसरातील न्यु मान हाॅटेल येथे घेऊन गेला आणि एक तास बसुन परत आनुन सोडले . दुसऱ्यांदा (दि.१८) आॅगस्ट रोजी सकाळी आरोपी ने अल्पवयीन मुलीला त्याच होटेल मध्ये घेऊन गेला व अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरीक संबंध केले व दुपारी परत आनुन सोडले . आरोपी ने तिसऱ्यांदा त्याच होटेल मध्ये त्याच रूम मध्ये नेऊन मुलीला एक हिरो कंम्पनीचा किपॅड चा मोबाईल दिला आणि त्याच मोबाईलवर आरोपी अल्पवयीन मुली सोबत संपर्क करीत होता .
आरोपीच्या कृत्याबाबत घरात कोणालाही काहीही सांगु नकोस म्हणुन आरोपीने मुलीला धमकी दिली होती . गुरुवार (दि.२५) सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलगी ही तिच्या भावाला फोनवर बोलत असतांना आढळुन आली , मुलीला तिच्या आई वडीलांनी विचारपुस केली , घडलेली हकीकत मुलीने सांगीतली . अल्पवयीन मुलीच्या बयाणा वरून कन्हान पोलीसांनी आरोपी एहतेशाम आलम वल्द शमीम अक्तर विरुद्ध अप क. ७२९/२५ , कलम, ६४ (२) (एम), ३५१ (२) बी एन एस सहकलम, ४,६,८,१२ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद केला .
सदर घटना गांभीर्याने घेत पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी स्टाफसह आरोपी एहतेशाम आलम वल्द शमीम अक्तर ला शनिवार (दि.४) आॅक्टोंबर रोजी पहाटे सकाळी ४ वाजता कामठी येथुन अटक केली . घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड करीत आहे . सदरची कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड , उपनिरीक्षक डीबी इंचार्ज प्रवीण हारगुडे, जैलाल सहारे , सम्राट वनप्रती , रवि मिश्रा यांनी केली .
Man arrested for raping 13-year-old minor girl
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time