कन्हान मध्ये मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडली
महिलांच्या मटकी फोड स्पर्धेला मोठा प्रतिसाद
कन्हान : - कन्हान शहरात जन्माष्टमी निमित्त गोविंदाचा जल्लोषात मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडली . सोमवार ला कानपूर केमिकल मैदानात नागपूर ग्रामीण चे शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या मार्गदर्शनात तनिष्क पिल्ले यांनी पुरुषांसाठी भव्य दहीहंडी व महिलांसाठी मटकी फोड कार्यक्रमाचे आयोजन केले . मटकी फोड मध्ये महिलांचे 5 ग्रुप तयार करण्यात आले .
यात सावित्रीबाई फुले या ग्रुप च्या पपित टेकाम यांनी प्रथम , राणी भलावी यांनी द्वितीय व राणी लक्ष्मीबाई ग्रुपच्या मेघा सहारे यांनी तृतीय बक्षीस पटकाविले . या प्रसंगी कृष्णकुमार अग्रवाल , डॉ.मैत्रा , शिवसेना शहर प्रमुख गजानन (गज्जु) गोरले , प्रकाश तिवारी , प्रदीप गायकवाड , महावीर खंगारे , दामू बंड , निक्कु पिल्ले , प्रशांत स्वामी , दिपचंद शेंडे , चेतन जयपुरकर , विनोद कांबळे , अभिषेक तांडेकर , योगराज अवसरे , शरद वाटकर , अतुल यादव , महेश मानकर , स्वप्निल नितनवरे , पुष्पाताई पिल्ले , मुक्ताताई मैत्रा , शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा मनिषा चिखले , उपाध्यक्षा लता लुंढेरे , निर्मला करंडे , नितू तिवारी , वैशाली श्रीखंडे , दिशा पाटील , प्रतिमा पौनिकर , कल्पना नगरकर , हर्षाली भनारकर , रंजिता सूर्यवंशी , स्नेहल राणे , माया तितरमारे , मंगला कावळे , विमल बोकसे , वीणा हूड , उर्मिला तितरमारे , रेखा कैकाडे , कविता घुले , वर्षा समुंद्रे , भारती सहानी , स्वाती मेश्राम , रेणू गजभिये , सपना कांबळे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time