शेतीच्या जुन्या वादावरुन अपघात करून खून करण्यात आला
पारशिवनी:- पारशिवनी शहरा मध्ये दिनांक २६/८/२५ ला गाडीला अपघात करून खून करण्यात आला.
हि घटना रामटेक सावनेर रोड वरील ग्रामीण रुग्णालया समोर दुपारी ४.३० मिनिटांनी घडली असून आरोपी लालु रानु भोयर वय ४० वर्ष मु पालोरा सरोदी टोली यांनी मुतक लालु आसाराम एकनाथ वय ४५ वर्ष राहनार पारशिवनी सरोदी टोली यांना जिवाने मारल्या ची बातमी पारशिवनी पोलीस स्टेशनला कळताच पारशिवनी पोलीस स्टेशन चे थानेदार आपल्या ताफ्यात सोबत घटना स्थळी दाखल होऊन आरोपी ला आपल्या ताब्यात घेऊन घटना स्थळावर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.
त्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले व अनूचित प्रकार घडू नये म्हणून शिवाजी चौकामध्ये कडे कोडेकोट बंदोबस्त लावण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक यांनी येऊन घटना स्थळाचा पंचनामा केला तसेच यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढील तपास पारशिवनी पोलीस स्टेशन चे थानेदार राजेश कुमार थोरात करीत असुन भादवी कलम १०९ ,१०३,(१),४/२५ लावण्यात आले.
pratinidhi- punadas Gajbhiye, Parshivani
प्रतिनिधी पुनादास गजभिये, दशरथ आकरे
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time