गणेश महोत्सव निमित्त कन्हान पोलीसांचा रुट मार्च
गणेश महोत्सव शांततेत पार पाडण्याचे पोलीसांचे नागरिकांना आव्हान
कन्हान : - आगामी राज्य गणेश महोत्सव निमित्याने शहरात कानून सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवार (दि.२६) आॅगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड कन्हान विभाग यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत रूट मार्च काढण्यात आला .
गणेश उत्सव निमित्याने रुट मार्च कन्हान पोलीस स्टेशन मधुन निघुन महामार्गने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नं.नाका , गहुहिवरा चौक , पर्यंत काढण्यात आला . यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य तारसा चौक येथे दंगा नियंत्रण रंगीत तालीम घेण्यात आली.
यावेळी रुट मार्च व दंगा नियंत्रण तालीम मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे सोबत ५ अधिकारी , १ आर सी पी पथक , १ एस.आर.पी.एफ. प्लाटुन , २२ अंमलदार, २७ होमगार्ड सैनिक हजर होते . रुट मार्च दरम्यान गणेश महोत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी नागरिकांना केले आहे . तारसा चौक , डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे होत कन्हान पोलीस स्टेशन येथे रुट मार्च चे समापन करण्यात आले .
Kanhan Police's route march on the occasion of Ganesh Mahotsav
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time