पारशिवनी येथिल वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले हे ठरले निष्क्रिय अधिकारी


पारशिवनी येथिल वनपरीक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले हे ठरले निष्क्रिय अधिकारी 


पारशिवनी :- तालुक्यांमध्ये वाघाची डहसत मोठ्या प्रमाणामध्ये चालू असुन याकडे लेले यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे  देऊरवाडा येथिल शेतकरयाला वाघाच्या हल्ल्यामध्ये आपले जिव गमवावे लागले .

      ‌.         एवढेच नाहीतर त्याच दिवशी तेथे ढोरे यांच्या गाईची वाघाने मारली लेले यांनी ताबडतोंब बंदोबस्त लावला असता तर वाघ सापडला असता हे कोण करणार पण जेव्हा तालुका प्रतिनिधी कालसर्प यांच्या कडे गेले तेव्हा लेले यांच्या सोबत फोन वरुन सम्पर्क केले तेव्हा लेले म्हणाले तुम्ही आम्हाला वाघ पकडू लागा आज असे तालुका प्रतिनिधी सोबत बोलू शकतात तर जनते सोबत कसे बोलत असतील किती दिवसा ढवलापुर,बनेरा,सिलादेवी,आवडेघाट,भिवसन,चारगाव, पेंच कैरी,कोडासावळी,पालासावळी,बिटोली आणि देऊरवाडा येथिल जनता वाघामुळे त्रस्त असल्यानंतर ही यांनी लक्ष दिले नाही.

                 यांना फक्त पगारच पाहिजे एवढेच नाहीतर शिवारबोडी निवारा मध्ये यांचा बंदोबस्त लावला असता विडियो क्यामेरयामधये सेल नाही.तर कर्मचारी उपस्थित राहत नाही.वाघ पाडण्याच्या नावाखाली यांचे कर्मचारी जुगार खेळणयामधये व्यस्त असल्यामुळे हया घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत एवढेच नाही तर लेले यांना फोन केले असता हे उलटे- सुटले उत्तर देऊन दिशाभूल करीत असल्यामुळे झालेल्या घटनेला आणि समोर होणारा घटनेला जबाबदार प्रविण लेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे,प्रशांत सावरकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या