आमदार मालामाल आणि जनता त्रस्त
आमदार मालामाल आणि जनता त्रस्त | महाराष्ट्रात गदारोळ |
पारशिवनी: महाराष्ट्रातील आमदार मालामाल होत. असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये जोर धरत आहे. याला जबाबदार कोण?
आमदाराला महिन्याचे मिळणारे वेतन:- १८२२०० रुपये+
महागाई भत्ता ३९१४८ रूपये+
टपाल भत्ता १०००० रुपये+
टेलिफोन भत्ता ८००० रूपये+
संघनक चालक भत्ता १०००० रुपये+
ड्रायव्हर पगार २०००० रुपये+
पी.ए चा खर्च ३०००० रुपये+
प्रत्येक बैठकीचा खर्च २०००
रुपये एकुण ३२४१४८ खर्च ( तिन लाख चोवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये प्रतेक महिन्याला मिळणारा पगार आहे.
आणि आयुष्य भर एस.टि बस चा प्रवास मोफत, आमदाराला क्याम्पुटर किंवा लापटाप मोफत, राज्यांमध्ये विमान प्रवास ३२ वेळा मोफत, राज्या बाहेर विमान प्रवास ८ वेळा मोफत,गाडी घेतली असेल तर त्याचा व्याज सरकार भरते, आमदाराचा खाजगी दवाखान्याचा ९० टक्के खर्च सरकार देते, काही आमदारांची परिस्थिती नाजूक आहे. पण ती बोटावर मोजण्या लाईक आहे.
एकुण आमदार २८८ आहेत त्या मध्ये करोडपती आमदार २६६ आहेत. काँग्रेस चे ९६ टक्के आमदार मालामाल आहेत, भाजपचे ९५ टक्के आमदार मालामाल आहेत, शिवसेनेचे ९३ टक्के आमदार मालामाल आहेत, राष्ट्रवादी चे ८९ टक्के आमदार मालामाल आहेत एवढेच नाही तर महाराष्ट्रातील आमदाराना १९७७ मध्ये २५० रुपये पेन्शन मिळत होती. तर तेव्हा पासून आतापर्यंत आमदारांनी विधानसभेत कोणतेही आंदोलन न करता २१ वेळा आपले पेन्शन वाढविली पण बाकी जनतेचा विचार न करता हे काम करण्यात आले.
तर आता यांना एक लाखाहून जास्त पेन्शन मिळत आहे. तर सध्या मिळत असलेले पेन्शन ६०५ आमदारांना मिळणारे पेन्शन ५० ते ६० हजार रुपये पेन्शन,१०१ आमदारांना मिळणारे पेन्शन ६१ ते ७० हजार रुपये पेन्शन,५१ आमदारांना मिळणारे पेन्शन ८० हजार रुपये, आणि १३ आमदारांना मिळणारे पेन्शन एक लाखाहून अधिक पण यांच्या पगाराचा उल्लेख पाच वर्षांचा केला तर २३३३८६५६० रुपये होते ( दोन करोड ते तीस लाख छयानशी हजार पाचशे साठ रुपये) होते.
यांना अवैध धंदया मधुन मिळणारी दैन वेगळी आहे.तसेच सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कडुन मिळणारी दैन वेगळी आहे.तर ठेकेदार यांच्या कडुन मिळणारी दैन वेगळी आहे.विविध मार्गाने मिळणारी दैन वेगळी आहे.पण यांचा पाच वर्षाच्या कालावधीत जमा होणारी रक्कम २३३३८६५६० एवढी मोठी रक्कम यांच्या कडे पाच वर्षां जमा होते .
पण हा पैसा कुणाचा हा जनतेचाच आहे न त्यानंतर यांच्या वारसांना पेन्शन दिल्ली जाते.पण यांच्या कडे कोणी गरजु व्यक्ती गेल्यास त्याला मदत न करता त्याला वापस केले जाते यावर जनतेने विचार करुन गरीब, कामांचा आमदारांची निवड करणे आवश्यक आहे.तसेच हे निवडुन एकदा आले आणि दुसर्यांना हारले आणि तिसऱ्यांदा निवडुन आले तर यांना डबल पेन्शन मिळते हा भष्टाचार नाही का
प्रतिनिधी: सतीश साकोरे , पारशिवनी-नागपूर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time