नगर पंचायत पारशिवनी च्या मुख्याधिकारी यांनी चावला बुलडोजर: सोनटक्के परिवाराला कधी मिळणार न्याय
नगर पंचायत पारशिवनी च्या मुख्याधिकारी यांनी चालविला बुलडोजर: सोनटक्के परिवाराला कधी मिळणार न्याय | Bulldozer driven by Nagar Panchayat Parshivani: When will Sontakke family get justice?
पारशिवनी येथिल सोनटक्के परिवाराला न्याय कधी मिळणार
पारशिवनी: नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथिल मुख्याधिकारी अर्चना वंजारी ( भिवगडे) यांनी दिनांक २१/११/२०२३ ला दुपारी तीन वाजेला कोणतीही सुचना न देता विनोद सोनटक्के यांचे घर पाडण्यात आले.
अविनाश सोनटक्के यांना, यांच्या प्रभागातील
काही लोकांनी फोन व्दारे सुचना दिली की तुमचे घर पाडण्याकरीता जे.सी.पी आलेली आहे आणि
नगर पंचायत ची टीम येत असल्याची सुचना मिळताच ते! तेथे येऊन पोहोचले तर तेथे
नगरपंचायतचा पुर्ण ताफा उपस्थित होता.
अविनाश सोनटक्के यांनी
पुढाकार प्रतिनिधी सतीश साकोरे यांच्या सी सम्पर्क करुन त्यांना सविस्तर माहिती सांगितले, की माझ्या सोबत
अन्याय होत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पुढाकार प्रतिनिधी तेथे पोहचले त्या
नंतर विडिओ बनवणे चालू केले तर मुख्याधिकारी वंजारी म्हणाल्या की ते विडिओ बनवत
आहेत ते शासकीय कामामध्ये अडथळा देत आहेत! त्यांची रिपोर्ट पोलीस स्टेशन ला द्या.
तेव्हा नगर पंचायत चे कर्मचारी म्हणाले की ते
पत्रकार आहेत. तेव्हा मुख्याधिकारी म्हणाल्या की तुमचे आयकार्ड दाखवा म्हटल्या नंतर पुढाकार प्रतिनिधी यांनी आयकार्ड दिला त्या नंतर मुख्य अधिकारी म्हणाल्या की तुमच्या सम्पादकाचा
नंबर द्या तो पण दिला त्या नंतर मुख्य अधिकारी म्हणाल्या की पोलीस येत आहेत.
पुढाकार प्रतिनिधी
यांनी थानेदार राहुल सोनवणे यांना फोन
करून म्हणाले की साहेब येथे सुचना न देता अतिक्रमण काढले जात आहे आणि मुख्य
अधिकारी म्हणत आहेत की यांच्या वरती गुन्हा दाखल करा ते शासकीय कामामध्ये अडथळा
निर्माण करीत आहेत. मि म्हणालो साहेब माझ्या नावाने गुन्हा दाखल करा नंतर काय करायचे ते मी
बघुन घेईन असे म्हणताच थानेदार यांनी फोन ठेवला.
विडिओ बनवायला सुरुवात केली आणि
मुख्याधिकारी यांचीही कार्यवाही सुरू झाली. मग यांनी सामान काढण्यास सुरुवात
केली.ते सामान काढुन नगर पंचायत च्या गाडी मध्ये ठेऊ लागलें त्या नंतर मुख्यअधिकारी यांना विचार आले त्यांनी ते सामान परत केले व टिना काढायला सुरुवात केली
त्या नंतर त्यांनी टिना काढुन बाजुला ठेवल्या मग जे.सी.पी लाऊन त्यांनी घर पाडले. ह्या घरांचे बांधकाम हे सिंगल विटांचे होते. तेथे जे.सी.पी ची आवश्यकता
नव्हती पण यांनी जे.सी.पी लावून ते पाडले व मुख्य अधिकारी म्हणाल्या की हे सर्व
खर्च जे लोक नालीच्या बाजुला बसले आहेत त्यांच्या कडुन वसुल केला जाईल असे मुख्याधिकारी
म्हणाल्या. पण यांनी यांना एकच नोटीस दिला होता.
अशी माहिती अविनाश सोनटक्के यांनी दिली. ह्या
गरीब जनते सोबत जर मुख्य अधिकारी अन्याय करीत असतील तर गरीब जनतेने न्याय कोणा कडे
मागायचा अशा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जेथे नाली बनत आहे तेथे सोनटक्के यांचे घर असुन त्यांच्या
समोर रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल यांनी मुख्याधिकारी यांच्या समोर
सांगितले होते की मी जो पर्यंत तुम्हाला प्लांट देत नाही तोपर्यंत तुमचे अतिक्रमण काढले
जाणार नाही.
असे आश्वासन आमदार आशिष जैस्वाल यांनी दिले
होते. पण
अविनाश सोनटक्के यांनी जेव्हा फोन केले तेव्हा आमदार जैस्वाल यांनी फोन उचलला
नाही. म्हणजे
यांनी सोनटक्के परिवाराला चाकलेट देऊन मोकळे झाले असे लक्षात आले.
म्हणजे नुकसान कुणाचे झाले गरीबांचे पण सोनटक्के
परिवार हे रोज मंजुरी करुन आपले प्रपंच कसे चालवितात हे त्यांनाच माहीती असुन
करोना काडा मध्ये त्यांनी मुलींचे लग्न पण केले आणि ते कर्ज बाजारी झाले त्याचकाळा
मध्ये सर्व काम धंदे बंद होते मुलीच्या लग्ना नंतर करोना मध्ये त्यांनी लोकांचे
कर्ज कसे फेडले आणि आणि आपले घर कसे चालविले हे त्यांनाच माहीती आहे.
त्यांना शासनाने प्लांट दिले नाही आणि त्यांचे
पण काही ऐकले नाही. शासनाचे एकच धोरण आहे की अन्न,वस्त्र आणि निवारा
ह्या गरजे पासुन कोणी ही वंचित राहू नये. आणि प्रधानमंत्री म्हणतात की सबको घर हे कुठे गेले म्हणजे
मरतात तर मरुदया आणि आनखी त्यांना मारा हा शासनाचा धोरण आहे.
तसेच सोनटक्के परिवाराने पुढाकार न्युज चॅनल
पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांना सांगितले की मला व माझ्या परिवाराला
येत्या आठ दिवसा मध्ये न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करीन किंवा आत्मदहन करीन अशी
चेतावणी शासनाला पुढाकार न्युज चॅनल द्वारे देण्यात आलेली असुन शासनाने ताबडतोब
लक्ष देऊन जिल्हाधिकारी यांनी सोनटक्के परिवाराला ताबडतोब न्याय मिळवून द्यावा आणि
दोषी मुख्याधिकारी अर्चना वंजारी ( भिवगडे) आणि रामटेक क्षेत्राचे आमदार आशिष
जैस्वाल यांच्या वरती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा जीवितहांणी झाल्यास शासन
जबाबदार राहतील असे सांगण्यात आले आहे.
सतीश साकोरे पारशिवनी तालुका प्रतिनिधी दि.२२/११/२०२३
प्रतिनिधी: सतीश साकोरे-पारशिवनी

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time