बारा फुट अजगराला सर्पमित्र तरुणांनी दिले जीवनदान
कन्हान : - नागपूर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वरील टेकाडी परिसरातील प्रीरिकेशन ड्रॉवेल (तार कंपनी) येथे निघालेल्या बारा फुट अजगराला वाइल्ड ऍनिमल ऍण्ड नेचर रेस्कु बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्र तरुणांनी पकडुन दुर जंगलात सोडुन जीवनदान दिले .
Snake-loving youths gave life to a twelve-foot python
गुरुवार (दि.३०) जानेवारी ला दुपारी टेकाडी परिसरातील प्रीरिकेशन ड्रॉवेल (तार) कंपनीत बारा फुटाचा अजगर आढळुन आल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते . सदरची माहिती वाइल्ड ऍनिमल ऍण्ड नेचर रेस्कु बहुउद्देशीय संस्था कन्हान चे सदस्य सर्प मित्र राजकुमार बावणे यांना मिळताच त्यांचे सहकारी चेतन ठवरे, बंटी हेटे, मंगेश मानकर यांना सोबत घेऊन कंपनीत त्वरित पोहचुन त्या बारा फुटाच्या अजगराला सुखरुप पणे पकडुन दुर देवलापार कडील घनदाट जंगलात नेऊन त्या अजगरास मुक्त संचार करण्यास सोडुन जिवनदान दिले.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time