आजपासुन दोन दिवस संत भाकरे बाबा जयंती महोत्सवाची सुरवात


आजपासुन दोन दिवस संत भाकरे बाबा जयंती महोत्सवाची सुरवात


कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील न्यू गोंडेगाव येथील मारोतराव लसुंते यांचा निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा समर्थ सद्गुरु संत भाकरे बाबा यांच्या १०४ व्या जयंती निमित्याने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

आज शनिवार (दि.८) फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कलश स्थापना , सायंकाळी ५ वाजता दिपोत्सव , ६ ते ७ वाजता पर्यंत हरीपाठ , रात्री ९ वाजता जागृतीचे भजन करण्यात येणार आहे . उद्या रविवार (दि.९) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प आशिष महाराज चटप यांचे गोपाल काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम व दुपारी ४ वाजता पासुन आगमना पर्यंत भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . या दोन दिवसीय कार्यक्रमाचा गावतील नागरिकांनी जास्तीस्त जास्त संख्येत उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आव्हाहन विलास लसुंते आणि सरिता लसुंते यांनी केले आहे .
Sant Bhakre Baba Jayanti festival begins for two days from today

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या