मराठा सेवा संघ कन्हान व्दारे जगतगुरू संत तुकाराम जयंती उत्साहात साजरी
कन्हान : - मराठा सेवा संघ कन्हान व्दारे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती संत तुकाराम महाराज मंदीर तुकाराम नगर कन्हान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
रविवार (दि.२) फेब्रुवारी रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराज मंदीर तुकाराम नगर कन्हान येथे संत तुकाराम महाराज यांची जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मराठा सेवा संघ कन्हान जेष्ठ मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर व सेवानिवृत्त सैनिक प्रविण सतदेवे, जेष्ट नागरिक नामदेव नवघरे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांचा मुर्ती ला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
यावेळी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते , नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांय्या कार्याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले . या प्रसंगी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे , माजी नगरसेवक मनोज कुरडकर , जिवन मुंगले , संदीप कुकडे , आशिष दिवटे , शैलेश शेळकी , राकेश घोडमारे , रामराव लुहुरे , संजय चंहादे , महेश काकडे , अमोल डेंगे , योगराज अवसरे , पुष्पाताई घोडकी , पुष्पा ताई खर्चे सह आदीनी पुष्प अर्पण करून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटात साजरी करण्यात आली .
Jagatguru Saint Tukaram Jayanti was celebrated with enthusiasm by Maratha Seva Sangh Kanhan
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time