महात्मा गांधी जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा


महात्मा गांधी जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा 


कन्हान : - केडीके कान्व्हेंट टेकाडी येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित

संस्थेचे संचालक अविनाश कांबळे यांच्या हस्ते महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . अविनाश कांबळे यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना , विद्यार्थांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी मनिषा कांबळे , सुरेखा हिंगे , अपर्णा गजभिये , रिना किशोर , अर्चना कारेमोरे ,  सह विद्यार्थी उपस्थित होते .

Mahatma-Gandhi-Jayanti-and-Dhamma-Chakra-Pravartan-Day-celebrated

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या