क्रेन मशीन खाली दबुन वेकोलि कर्मचाऱ्याचा मृत्यु
डब्लुसीएल खदान परिसरात धक्कादायक घटना , कन्हान पोलीस विभागा कडुन चौकशी सुरु
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डब्लुसीएल एकीकृत इंदर कामठी डीप ओपन कास्ट माईंन्स मध्ये काम करणाऱ्या वेकोलि कर्मचाऱ्याचा क्रेन मशीनच्या खाली दबुन मृत्यु झाल्याने डब्लुसीएल परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
Vekolhi employee dies after being crushed under crane machine
प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.९) आॅक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता पासुन ते रात्री १० वाजता पर्यंत डब्लुसीएल कामठी खदानच्या आत मध्ये रविप्रकाश रामप्रशाद कुशवाह (वय ५९) रा.खदान हे आपल्या ड्युटीवर हजर होते .
त्यांचे सोबत एक्सेवेटर मशीन (पोकलॉन्ड) चालक नामे श्रीकांत रामकृष्ण नितनवरे (वय३२) रा.उमरगाव ह.मू.कांद्री (कन्हान) ड्युटीवर हजर असून तो पोकलॉन्ड मशिनने होलपॉक (डप्पर ट्रक) मध्ये माती भरत होता . रात्री ८:३० वाजता च्या दरम्यान मशिनच्या मागच्या बाजूला ५० मिटर दुर वर उभा असतांनी रविप्रकाश यांना मशिनच्या सायलेन्सर मधून खूप मोठ्या प्रमाणात धूर निघतांनी दिसला . त्यांनी श्रीकांत - श्रीकांत असा ऑपरेटरला आवाज दिला व तो पोकलॉन्ड ने डप्पर मध्ये माती भरतांनी दिसुन आला नाही .
WCL-employee-dies-after-being-crushed-under-crane-machine
रविप्रकाश यांनी पोकलॉन्ड मशिन जवळ टार्च लावून जात असतांना मशिनच्या अगोदरच १५ फुट अंतरावर पोकलॉन्ड चालक श्रीकांत रामकृष्ण नितनवरे हा मशिन गेलेल्या चाकुलीवर मृत अवस्थेत चेद्दा-मेद्दा स्थितीत दिसुन आला . रविप्रकाश यांनी शिफ्ट इंचार्ज शरद नागपूरे यांना फोन करून घटनेची माहीती दिली .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आपल्या स्टाफ सह घटनास्थळी दाखल झाले . पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे नेण्यात आले . मृतक श्रीकांत नितनवरे हा एक्सेवेटर (पोकलॉन्ड) नंबर - १०१७९ वर मशिन ऑपरेटींग करत असतांनी त्याचा तोल जावून तो मशिनच्या ट्रॅकचैनच्या खाली दबून मृत्यु झाला . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी रविप्रकाश कुशवाह यांचा तक्रारी वरून मर्ग चा गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
wcl employee dies after being crushed under crane machine
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time