एका महान युगाचे प्रवर्तक महात्मा गांधीजी:प्रा.जयराम माळी
सुरगाणा महात्मा
गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी
करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. सी. जी दिघावकर यांनी केले. या प्रसंगी इतिहास विभागातील प्रा. जयराम माळी
प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की, गांधीजी एका सुवर्ण युगाचे शिल्पकार आहेत. 1942 ते 1948 या काळात त्यांची भूमिका ही खूपच महत्वपूर्ण होती.
भारत पाकिस्तान फाळणी आणि नव्या नेतृत्वाचा उदय ह्या सारख्या अनेक गोष्टीना
त्यांना सामोरे जावे लागत होते.
फाळणीची बोचणी ही
त्यांना आपल्या शेवटच्या श्वसपर्यंत होती. अहिंसा व सत्यग्रह हे तत्व त्यांनी
आयुष्यभर अंगीकारले. तसेच प्रेम, दया व क्षमा ही त्यांची कामावलेली शस्र होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य
आपल्या मार्गदर्शवर भाषणात म्हणाले, गांधीजी हे भातातील प्रत्येक माणसाला आजही आदर्शवत
आहेत. त्यांची अहिंसा ही शिकवण आजच्या प्रत्येक नागरिकांने अंगीकरावी. गांधीजी हे
राष्ट्रपिता होऊन गेले हा कायम अभिमान आपल्याला असावा. यावेळी उपप्राचार्य व्ही.डी.अहिरे, शैक्षणिक
समन्वयक प्रा.एस.एम. भोये, कार्यालयीन अधीक्षक
श्री आर.टी.चौधरी व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी
मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टोपले यांनी केले तर
आभार प्रदर्शन भावना गावित हिने केले.
| Mahatma Gandhi | the pioneer of a great era:| Prof. | Jairam Mali |

.jpg)


Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time