कारवाई दरम्यान देशी दारु , विदेशी दारु सह एकुण २५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त
एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
कन्हान - कन्हान शहरातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील साई पान पॅलेस टपरी वर कन्हान पोलीसांनी छापा मारला असता पोलीसांना अवैधरित्या दारु विक्री करतांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी देशी दारु , विदेशी दारु सह एकुण २५९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दि ४ नोव्हेंबर ला दुपार च्या सुमारास कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि साई पान पॅलेस येथे अवैध रित्या विना परवाना दारु ची विक्री सुरु आहे . अश्या विश्वसनीय माहिती वरुन कन्हान पोलीसांनी साई पान पॅलेस टपरी वर धाड मारली असता १) सात निप देशी दारु भिंगरी सन्ना नं १ प्रत्येकी ७० रु प्रमाणे एकुण ४९० रु. २) सहा निप विदेशी दारु आॅफीसर चाईस ब्लु असे लिहलेले प्रत्येकी १५० रु प्रमाणे एकुण ९०० रु ३) आठ निपा १८० एम एल विदेशी दारु ज्यावर इम्पेरियल ब्लु असे लिहलेले प्रत्येकी १५० रु प्रमाणे एकुण १२०० रु असा एकुण २५९० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीसांनी आरोपी रजत प्रदीप पवार रा.शिवाजी नगर कन्हान याला ताब्यात घेतले .
सदर प्रकरणा बाबत सरकार तर्फे फिर्यादी विनोद रामकृष्ण काळे यांच्या तक्रारी वरून पो.स्टे. ला आरोपी रजत पवार याचा विरुद्ध कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड काॅंस्टेबल नरेश वरखडे , पोलीस शिपाई कोमल खैरे हे करीत आहे .


Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time