सराईत गुन्हेगार मनोज चैतराम चिमणकर यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध


सराईत गुन्हेगार मनोज चैतराम चिमणकर यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध


कन्हान पोलीसांचे तत्पर आणि प्रभावी पाऊल


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा सराईत गुन्हेगार मनोज चैतराम चिमणकर (वार्ड क्र. ६, संताजी नगर, कन्हान-कांद्री) याला एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रतिबंधक घातक क्रियाकलाप अधिनियम) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे . 


सदर आरोपीवर स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाखाली १ गुन्हा , तसेच अवैध जुगाराचे ५ गुन्हे नोंद असून तो सतत गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेला होता . नागपूर ग्रामीण पोलीसांनी त्याच्या विरुद्ध पूर्वी अनेक वेळा कारवाई केली असून प्रतिबंधात्मक उपाय योजना ही केल्या होत्या . परंतु त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवली . आरोपीचे वर्तन समाजातील कायदा - सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याचे लक्षात घेऊन कन्हान पोलीसांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली .

Inmate criminal Manoj Chaitram Chimankar has been booked under the MPDA Act.

गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी मा.जिल्हाधिकारी विपिन ईटनकर , नागपूर यांनी मनोज चैतराम चिमणकर यास एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह , नाशिक येथे स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला . आदेश मिळताच कन्हान पोलिसांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली व त्याच दिवशी मध्यवर्ती कारागृह , नागपूर येथे दाखल केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या