कन्हान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा


कन्हान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा


कन्हान : - कन्हान शहरात विविध संघटन द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .


भोजनदान कार्यक्रमाने धम्मचक्र प्रवर्तन व विजयदशमी दिवस उत्साहात साजरा


कन्हान : - राजे फाउंडेशन कन्हान आणि सत्तधम्म बौद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने  धम्मचक्र प्रवर्तन आणि विजयीदशमी दिवस निमित्त रेल्वे स्टेशन रोड, गांधी चौक येथे 

भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सर्व प्रथम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . या उपक्रमात बाहेरून येणाऱ्या हजारो भाविकांसाठी भोजनदानाची व्यवस्था करुन वितरण करण्यात आले . धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी हा सामाजिक ऐक्य व बंधुभाव वाढवणारा दिवस आहे. भोजनदान उपक्रमाद्वारे या पवित्र दिवशी भाविकांची सेवा करण्याचा आम्हाला आनंद आहे , असे आयोजकांनी सांगितले . या प्रसंगी राजे फाउंडेशनचे अध्यक्ष केतन भिवगडे ,  कैलासजी भिवगडे , आर्यन मेश्राम , रोशन सोनटक्के , नितीन मेश्राम , रॉबिन निकोसे , चिराल वैद्य , रितेश जनबंधू , प्रणय भिवगडे , शुभम चहांदे , देवांशू मेश्राम , अनिकेत मेश्राम , अर्चना मेश्राम , वंदना भिवगडे , वैशाली गजभिये , वनमाला चहांदे , संजना मेश्राम , भारती भिवगडे ,संघमित्रा राऊत , सुजाता वासे , वर्षा मेश्राम , करिश्मा मेश्राम , रीना मेश्राम सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .



सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा



कन्हान : - सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , अशोक पाटील यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . बुंदु वितरित करुन धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . या प्रसंगी कैलास भिवगडे , नितिन मेश्राम , चिराल वैद्य , हरिष इंगोले , राॅबीन निकोसे , किशोर यादव , अक्षय फुले सह आदि नागरिक उपस्थित होते .

Dhammachakra Pravartan Day celebrated with great enthusiasm at Kanhan with various programs

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या