दसर उत्सव समिति द्वारे रावन दहन
कन्हान : - कन्हान शहरातील अशोक नगर येथे दसर उत्सव समिति द्वारे रावन दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . गणेश मंदिर येथे राम , लक्ष्मण , सीता , हनुमान यांची पुजा अर्चना करून ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करुन अशोक नगर पर्यंत मिरवणुक काढण्यात आली . अशोक नगर येथे प्रभु श्रीराम दरबार यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हनुमान चालीसा पाठन करुन आरती करण्यात आली .
रामच्या हस्ते रावन दहन करण्यात आले . रामाच्या वेशभूषेत आर्यन संतापे , लक्ष्मणच्या दक्ष तितरमारे , सीताच्या वेशभूषेत लावण्या पोटभरे , हनुमानच्या वेशभुषेत यतार्थ पोटभरे होते . या प्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे , शुभम बावनकर , ऋषभ बावनकर , कैप्टन सतीश बेलसरे , लोकेश दमाहे , हरीष पोटभरे , अमित बेलसरे , हिमांशु सावरकर , हितेश राजपुत , सुर्या संपाते , वेदांत बावनकुळे , अनिकेत संतापे , अभिषेक साखरे , निखिल मेश्राम , गुड्डा सुर्यवंशी , रोहित संतापे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time