जय माता दी , नवदुर्गा माता की जय च्या जयघोषात कन्हान नगरी दुमदुमली
कन्हान : - कन्हान - पिपरी शहरातील प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी - कन्हान व्दारे कन्हान नदीच्या पावन जल भरून भव्य कलशधारी महिला , कावड धारी पुरूष , देवीचे नऊ रूपाचे रथ , भजन मंडळ , बैंड वाजा , डिजे च्या मधुर आवाजात भव्य कलश, कावड यात्रा काढुन नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करून नऊ दिवस आरती, भजन, जस आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे .
दरवर्षी प्रमाणे सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी- कन्हान व्दारे प्राचिन दुर्गा माता मंदीर चौक पिपरी येथे पारंपरिक संस्कृती प्रमाणे सोमवार (दि.२२) सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पावन कन्हान नदी पात्रात नदी व कलशाची पुजा अर्चना करून १०८ कलशात जल भरून बीकेसीपी शाळे पासुन महामार्गाने कलश धारी कन्या व महिला आणि कावड धारी पुरूषा सह नवदुर्गे चे नव रूप प्रतिमा, हवन कुंडच्या रथ, भजन, जस मंडळ, डि जे, बँड वाजवित "दुर्गे मातेचा जय जयकार करून नाचत गाजत भव्य कलश, कावड यात्रा काढुन महामार्गाने गांधी चौक , नगरपरिषद , कन्हान पोलीस स्टेशन, आंबेडकर चौक होत पिपरी मार्गाने दुर्गा माता मंदीरात पोहचली .
पिपरी मंदीरात या कन्हान नदीच्या पावन कलशातील दुध , दही , जल , पंचअमृताने मातेचा जलअभिषेक करून पुजन व घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला . दररोज सकाळ व संध्याकाळ पूजापाठ, महाआरती , भजन , जस , जागरण सह धार्मित कार्यक्रमाचे आयोजन करून मंगळवार (दि.३०) रोजी अष्टमी महायज्ञ २१ हवन कुंड पूजन, बुधवार (दि.०१) ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पासुन भव्य महाप्रसाद. गुरूवार (दि.२) ऑक्टोबंर रोजी सकाळी ९ वाजता घट विसर्जन आणि सायंकाळी ७ वाजता रावण दहन करून नवरात्री महोत्सवाची सांगता करण्यात येईल. कन्हान व परिसरातील भाविक भक्तांनी वेळेवर उपस्थित राहुन नवदुर्गा मातेचा आशिर्वाद घेऊन या नवरात्र महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजानिक नवदुर्गा उत्सव मंडळा चे अध्यक्ष देवा चतुर यांनी केले आहे .
महोत्सवाच्या यशस्वितेकरिता मंडळा चे राधेश्याम भोयर , माजी नगरसेविक मनोज कुरडकर , प्रशांत मसार , शालिकराम ठाकरे , केसरीचंद पटेल , बाला खंगारे , शितल भीमनवार , फजित खंगारे , प्रमोद मोटवानी , अशोक मेश्राम , विशाल येलमुले , विजय खडसे , गंगाधर तिवाडे , सचिन खंगारे , विशाल ढोंमणे , तुषार येलमुले , दुर्गेश फुलझेले , सारंग कुथे , नंदु येलमुले , सुनिल चापले , कृणाल येलमुले , सोनु कुरडकर , कृणाल खडसे , हिमांशु येलमुले , रोशन खंगारे सह समस्थ पिपरी, कन्हान नगरवासीयांनी कलश , कावड यात्रेत मोठया स़ख्येने उपस्थित राहुन नवरात्र महोत्सवा करिता सहकार्य करित आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर



Responsive Advertisement
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time