कन्हान: कन्हान पोलीस स्टेशन येथे १ फेब्रुवारी २०२५ रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले , ज्यात राज्यपाल पुरस्कार भुषविणारे पोलीस पाटील मनोज मेहुणे यांचा थाटात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मनोज मेहुणे यांच्या दीर्घकाळी आणि उत्कृष्ट सेवेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपक बाबु पालिवाल , जिल्हाध्यक्ष मारोती ठाकरे , सहसचिव गुंडेराव चकोले, तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे होते.
मनोज मेहुणे हे कळमेश्वर तालुक्यातील उबाळा गावचे आहेत आणि ते वर्ष २०१६ पासून पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला . या पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मान्यता मिळाली .
शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांचा वतीने कन्हान पोलीस स्टेशन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पोलीस पाटील मनोज मेहुणे यांचा शाल , श्रीफल , आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच, कार्यक्रमात उपस्थितांना दिनदर्शिका वितरित करण्यात आल्या . कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना चहा आणि अल्पोपहार दिले गेले .
कार्यक्रमाच्या आयोजनात कन्हान पोलीस स्टेशनचे अध्यक्ष लोमेश्वर गडे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण कुथे, सहसचिव निखिल बागडे, कोषाध्यक्ष नरेंद्र राऊत, कृणाल ब्राम्हणे, अजय ईखार, संदीप नेहुल, राहुल कालबेले, प्रदीप ऊके, शालु घरडे, सोनु गेडाम, योगेश नांदुरकर, संजय नेवारे, संदीप भोले, संतोष ठाकरे, अरविंद गजभिए, चक्रधर वासनिक, कैलाश कारेमोरे, विकास हटवार, शुभम बल्लारे आणि इतर पोलीस पाटील प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय ईखार यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश नांदुरकर यांनी केले. या कार्यक्रमामुळे मनोज मेहुणे यांचे योगदान आणि पोलीस पाटील संस्थेतील महत्त्व दर्शविणारा एक आदर्श समोर आला.
Manoj Mehune, who received the Governor's Award, was felicitated at Kanhan Police Station.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time