आमडी फाटा ते सावनेर फुटलेला रोड व मोठं मोठ्या भेगा
पारशिवनी : नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील सावनेर ते आमडी फाट्या रोड वरती मोठं मोठ्या भेगा ( फुटलेला) असुन याकडे रामटेक क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल, सार्वजनिक बांधकाम विभाग हायवे नागपूर चे बोरकर, ठाकरे, मुन आणि ईमफा कम्पनी चे ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे सावळी ते आमडी फाट्या रोड वरती मोठं मोठ्या भेगा, फुटलेला असल्यामुळे येणार्या आणि जाणार या लोकांना कसरत करत जावे यावे लागत असल्यामुळे जनते मध्ये भिंतीचे वातावरण तयार झाले आहे.
तसेच पेंच नदीवरील पुलावरती जीव घेणे मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे हे खड्डे वाचविण्याच्या चक्कर मध्ये आणि पडलेल्या भेगा, फुटलेला रोड मुळे आता पर्यन्त किती तरी अपघात झाले. आहेत आणि ह्या भेगा मध्ये मोटारसायकल चे चाककधी फसेल आणि जिवीत हानी होईल हे सांगता येत नाही.
एवढेंच नाही तर आता पावसाळा सुरू झाल्यामुळे ह्या भेगा मोठ्या होऊन जिवीत हानीला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.याकडे क्षेत्राचे आमदार आशिष जैस्वाल आणि नव्याने नियुक्त झालेले क्षेत्राचे खासदार श्याम कुमार बर्वे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हायवे नागपूर चे बोरकर, ठाकरे आणि मुन यांनी ताबडतोब लक्ष देऊन समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याची चेतावणी जनतेनी दिली आहे.
सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time