कन्हान येथे अयोध्येचा श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात साजरा
पिपरी - कन्हान सार्वजनिक नवदुर्गा मात मंदिरात आणि पटेल नगर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - अयोध्या च्या मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा वर्षापुती सोहळा शहरातील पिपरी - कन्हान सार्वजनिक नवदुर्गा मात मंदिरात आणि पटेल नगर येथे विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .
पिपरी - कन्हान सार्वजनिक नवदुर्गा माता मंदिर
पिपरी - कन्हान सार्वजनिक नवदुर्गा माता मंदिरात अयोध्या येथील राम मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष झाल्याने वर्षगांठ दिवस थाटात साजरा करण्यात आला . प्रभु श्रीरामचंद्राच्या मुर्तीचे अयोध्या येथील राम मंदीरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेला बुधवार ला एक वर्ष पुर्ण झाले . या निमित्त सार्वजनिक नवदुर्गा माता मंदिर कमेटी पिपरी व्दारे प्रभु श्रीराम च्या प्रतिमेला ला पुष्पहार अर्पण केले . परिसरातील नागरिकांनी पूजापाठ करून भजन गायनाचा कार्यक्रम करित आरती करून जय श्रीराम च्या जय घोषात महाप्रसाद स्वरुपात भोजनदान व मिठाई वाटुन वर्षगांठ दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सार्वजानिक नवदुर्गा माता मंदिर समितीचे राधेश्याम भोयर , मनोज कुरडकर , प्रशांत बाजीराव मसार , देवा चतुर , बाला खंगारे , प्रकाश मोटवानी , रवि अजबले , खुशाल येलमुले , फाजित खंगारे , मनहोर कुवामानोरे , स्वप्निल फुलझले , बंटी ढोले , कुणाल तिवाडे , दैविक मसार , लला कार्तिक , वैभव फुलझले , सोनु कुरडकर , पूछी खांडेकर सह आदि नागरिक उपस्थित होते .
पटेल नगरात श्रीराम मंदिराच्या वर्षपूर्ती सोहळा साजरा
अयोध्या च्या मंदिरात श्रीराम मुर्ती प्राण प्रतिष्ठा वर्षापुर्ती सोहळा पटेल नगर मित्र परिवार व बाल गणेश उत्सव मंडळा व्दारे पटेल नगर येथे जय श्री राम च्या जय घोषात साजरा करण्यात आला . जग प्रसिध्द अयोध्या येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मुर्तीची प्राण प्रतिष्ठा होऊन एक वर्ष पूर्ण झाले . या निमित्ता ने कन्हान शहरातील पटेल नगर येथे पटेल नगर मित्र परिवार व बाल गणेश उत्सव मंडळा व्दारे तब्बल अकराशे दिवे लावुन व रांगोळ्या काढुन श्रीरामाच्या प्रतिमेचे जेष्ठ नागरिक मनोहर मंदुरकर , सामजिक कार्यकर्ते बबलु यादव , शेषराव शिंदेमेश्राम , नगरसेविका सौ.वर्षा लोंढे , माजी नगरसेवक अजय लोंढे यांचा हस्ते पूजा , अर्चना करून सामुहिक श्री हनुमान चालीसा पठण करुन जय श्रीराम च्या जयघोषात भव्य महाप्रसाद वितरण करण्यात आले . या धार्मिक कार्यक्रमाचा शहरातील नागरिकांनी लाभ घेतला असुन प्रत्येक वर्षी अयोध्येतील श्री राम मंदिरा च्या वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे हिंदु धर्म प्रचारक जयकुमार यादव यांनी सांगितले . कार्यक्रमाच्या यशस्विते करिता बाल गणेश उत्सव मंड ळाचे विक्की हावरे , कमलेश गोंदुळे , कुणाल बावणे , प्रविण मंदुरकर , चंचल यादव , लक्ष्मण ठाकरे , श्याम अवस्थी , करण देवगडे , दादु डेवगडे , राजु मेश्राम , नरेश कुमार खंडाते , किशोर उके , शुभम मेश्राम , रोहित हावरे , केतन मेश्राम , करण खंडाते , निक्की खंडाते , सूरज यादव , शांतनु राऊत , निलेश पंडितकर , मंगेश भोयर , अमोल मारबते , लक्ष्मीताई बावने , हसरी पंडितकर आदींनी परिश्रम घेतले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time