गरजु विद्यार्थ्यांना वाटले शाळेचे साहित्य


गरजु विद्यार्थ्यांना वाटले शाळेचे साहित्य 

पारशिवनी :- विश्व मानव रूवानी केंद्र नवा नगर हरियाना ची पजीकूत गैर लाभकारी चैरीटेबल सोसायटी आहे.जी २००५ पासून निरंतर समाजसेवेची एक अनुकरणीय मिसाल पेश करीत आहेत.

                संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विश्व मानव रूवानी केंद्र नवा नगर नागपूर च्या माध्यमामधुन खापरखेडा येथे एकुण २४ जिल्हा परिषद च्या शाळेमध्ये १००५ जरुरत मंद विद्यार्थ्यांना निःशुल्क लेखन सामग्री वितरीत केली.पारशिवनी तहसिल च्या एकुण १८ शाळा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या या जास्तीत जास्त शाळा आदिवासी विभागाच्या होत्या ह्या शाळा महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेश च्या सिमेवर असुन डाट जंगला मध्ये आहेत. येथे आज पर्यंत अशी एकाही संस्थेची आणि शासकीय मदत मिळालेली नाही.अभियाना मार्फत शाळेच्या मुलांना नोटबुक, पेन्सिल,बाक्स, पेन्सिल किट,वाटर बाटल आणि वाक्स कलर बाक्स आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.

               यह कार्य आध्यात्मिक प्रमुख संत बलजीत  सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्वयंसेवकांनी तना,मनानी मदत केली. विश्व मानव रूहानी केंद्र २००५ पासून चिकित्सा,शिक्षा आणि समाज सेवा करीत आहे.हरियाणा मधील पंचकुला जिल्ह्यातील नवा नगर गावा मध्ये मुख्यालय असून संस्थेचे भारतभर २४० पेक्षा जास्त केंद्र आहेत. संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की संस्थे मार्फत असे कार्य वेळोवेळी आयोजित करुन राबविले जात यांनी असे आवाहन केले हे समाजाला प्रेरणा आणि सशक्तीकरणा चा संदेश देणारे कार्य आहे .अशी माहिती प्राप्त झाली.

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या