अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक मृत, एक जख्मी


अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक मृत, एक जख्मी


अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत आसोली - सालईमेटा शिवारात झालेल्या भिषण अपघातात बाइक चालक घटनास्थळी मृत पावला असुन सोबत बसलेल्या इसमाची प्रकृती चिंताजनक असुन त्याला उपजिल्हा रुग्नालय रामटेक येथे पाठविण्यातआले आहे.


5 एफ्रील ला  सकाळी 10 वाजता झालेल्या  अपघातात  घटनास्थळावरून अज्ञात वाहन धडक देवून फरार झाला आहे. घटनास्थळी  मरण पावलेल्याचे  नाव विजय नामदेव खंडाते मुक्काम  कोदामेंढी आहे तर जख्मी  असलेल्याचे नाव कैलाश वरठी असुन मुक्काम  तुमडीटोला ,तालुका रामटेक येथील निवासी आहे.


दुर्घटनेची  माहिती मिळताच अरोली पोलीस स्टेशनचे थानेदार श्री निशांत फुलेकर , संदिप बाजनघाटे,   टिकाराम जाधव  मनोज कुमार जयस्वाल , मंगेज निभार्ते  घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदना करीता पाठविला असुन जख्मीला उपजिल्हा रुनालयात पाठविले आहे.  पुढिल तपास श्री निशांत फुलेकर व त्यांची चमु करीत आहे .


पुढाकार 24 न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या