देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सभास्थळी नागरिकांनी सर्वसाधारण नियम पाळावे - पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार |Citizens should follow general rules at Prime Minister Narendra Modi's meeting place - Superintendent of Police Harsh Poddar

 

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सभास्थळी नागरिकांनी सर्वसाधारण नियम पाळावे - पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार | Citizens should follow general rules at Prime Minister Narendra Modi's meeting place - Superintendent of Police Harsh Poddar


नागरिकांनी पोलीस बंदोबस्तात पोलीस प्रशासना ला सहकार्य करावे - पोनि उमेश पाटील 



कन्हान : - देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार हे सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ संबंधाने ग्रोमर वेंचर्स मैदान कन्हान येथे बुधवार (दि.१०) एप्रिल रोजी प्रचार सभा आयोजित केली असुन सदर प्रचार सभेत येतांनी जनतेने सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम व अटीचे पालन करुन पोलीस प्रशासना ला सहकार्य करावे असे कडकडीचे आवाहन नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार आणि पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे .

 

नागरिकांनी खालील दिलेले सर्व नियम पाळावे

 

१) देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा सुरू होण्या अगोदर सर्व नागरिकांनी सभास्थळी ४.४५ वाजता पर्यंत हजर होतील . तसेच वृध्द,पुरूष व महिलांनी नमुद वेळेच्या व गर्दी होण्या अगोदरच सभास्थळी हजर व्हावे.

 

२) सभेसाठी येणारे सर्व जनतेने जेवन करूनच सभास्थळी यावे सदर सभास्थळी पाणी पिण्याची सोय केलेली आहे.

 

३) सभेसाठी येणारे सर्व जनतेने आपल्या सोबत कोणतेही बॅग व इतर वस्तू ज्यामध्ये पाणी बॉटल, टिफीन डबा सोबत आणु नये. तसेच सिगारेट, लॉयटर, दारू बॉटल, इलेक्ट्रॉनिक गाडीची चावी व इतर आक्षेपार्ह वस्तु सोबत आणु नये.या सारख्या बॅग व वस्तू सोबत असल्यास त्यांना सभास्थळी प्रवेश दिला जाणार नाही.

 

४) सभेसाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना असे कळविण्यात येते की आपल्या सोबत कुणीही काळे कापड व काळा झेंडा आणु नये तसेच परीधान देखील करून येवु नये असे आढळयास सदर इसमाला सभास्थळी प्रवेश दिला जाणार नाही .

 

५)सभास्थळ ठिकाण ग्रोमर वेंचर्स मैदान कन्हान नागपुर याच्या आजु बाजुच्या १ किलो मीटर अंतराचे आत मध्ये राहणाऱ्या सर्व रहवाश्यांनी आपल्या घरी सोमवार (दि.८) ते बुधवार (दि.१०) एप्रिल रोजी च्या कालावधीत कोणतेही नातेवाईक ,मित्र, किवां इतर इसम पाहुणा म्हणुन आल्यास त्या बाबत पोलीस स्टेशन कन्हान येथील पोलीस निरिक्षक उमेश पाटील मो.क्र ९८२२५११७५१ यांना त्वरीत फोनव्दारे माहीती देतील यामध्ये कुणीही हयगय करणार नाही.

 

६)सभा स्थळ ठिकाण ग्रोमर वेंचर्स मैदान कन्हान येथे येण्याकरीता बस किवां इतर मोठया वाहनाचा वापर करू नये तसेच जवळील परीसरात राहणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही वाहनांचा वापर न करता पायी सभास्थळी यावे.

 

तरी वरीलप्रमाणे नियम व अटी सर्व नागरीकांनी पाळणे बंधनकारक आहे.

 

प्रचार सभेच्या संर्दभात जड वाहनांच्या रहदारीचे नियमनाबाबत

 

नागपुर ग्रामीण घटकातील पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत लोकसभा निवडणुक - २०२४ संदर्भात रामटेक लोकसभा निर्वाचन प्रचारार्थ सभास्थळ ग्रोमर वेंचर्स कन्हान शहर येथे बुधवार (दि.१०) एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजता मा.नरेंद्र मोदी,प्रधानमंत्री,भारत सरकार यांचे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर सभेकरिता रामटेक लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते व लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहरकडे जाणारा रस्ता हा कन्हान शहरातून जात असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या जड,अवजड व इतर वाहनांची संख्या जास्त प्रमाणात आहे.

सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले स्थळ हे कन्हान शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असल्याने वाहतूकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. करीता वरील परिस्थिती टाळण्यासाठी बुधवार (दि.१०) एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजता पासुन ते ९.०० वाजता पर्यंत सर्व प्रकारचे जड,अवजड व इतर वाहनांना मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहरकडे जाण्यास प्रवेश देणे सर्वसाधारण जनतेच्या जिवीतास धोकादायक आहे.

तरी सभास्थळ ग्रोमर वेंचर्स मैदान कन्हान शहर येथील मा. नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री, भारत सरकार यांचे प्रचार सभे निमित्त राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहर हददीपर्यंत बुधवार ला दुपारी १२.०० वा.पासुन ते रात्री ९.०० वाजता पर्यंत सर्व प्रकारच्या जड, अवजड व इतर वाहन वाहतुकी करिता बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणुन खालील मार्ग वाहनांच्या वाहतुकीकरिता उपलब्ध आहेत.

 

१) नागपूर वरून जाणाऱ्या वाहनाकरीता मार्ग आशा हॉस्पीटल - कामठी-भानेगाव (खापरखेडा)- पारशिवनी आमडी फाटा- मनसर या पर्यायी मार्गाने रामटेक तुमसर करीता वळविण्यात येत आहे.

 

२) राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ मनसर ते कन्हान मार्गे नागपूर शहरकडे जाणारी वाहतुक आमडी फाटा-पारशिवनी-भानेगाव (खापरखेडा) - दहेगाव रंगारी - कोराडी-नागपूर शहर हददीपर्यंत.

 

मा. प्रधानमंत्री यांच्या सभास्थळी पार्किंग व ड्रॉप पाईंट ची माहीती

 

मा.प्रधानमंत्री भारत सरकार हे सार्वत्रीक लोकसभा निवडणुक २०२४ संबंधाने ग्रोमर वेंचर्स मैदान कन्हान येथे बुधवार रोजी प्रचार सभा आयोजित केली असुन सदर सभेच्या ठिकाणी येतांनी जनतेकरीता खालील प्रमाणे पार्कीगस्थळ, पार्कीग स्थळापासुन सभास्थळाचे अंतर तसेच जनतेने कोणत्या ठिकाणी वाहनातुन उतरायचे या बाबत नियम पाळावे

 

१) बोर्डा रोड वरील रूद्रा पेट्रोलपंप येथे पारशिवनी, रामटेक, नगरधन, मनसर, देवलापार, भंडारा, मौदा वरुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

२) मॉर्डन सिटी येथे तरसा, निमखेडा, भंडारा, मौदा वरुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

३) पानतावने यांचा शेतात नागपुर शहर , बुट्टी , बेला वरुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

४) न्यु गोंडेगाव येथे पारशिवनी, रामटेक, नगरधन,मनसर, देवलापार, भंडारा,मौदा वरुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

५) रिता स्टिल कंपनी सत्रापुर येथे नागपुर शहर, खापरखेड़ा, सावनेर,काटोल,कळमेश्वर,कोरडी वरुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

६) खंडेलवाल कंपनी येथे नागपुर शहर, खापरखेड़ा, सावनेर , काटोल , कळमेश्वर , कोरडी वरुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

७) कानपुर केमिकल ग्राउंड कन्हान येथे नागपुर शहर व इतर शहरातुन येणाऱ्या नागरिकांच्या वाहणाच्या पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे .

 

कन्हान येथे होणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सभे निमित्त नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी कायदा सुव्यवस्था लक्षात घेत काही नियम व अटी लागु केले आहे . या नियमाचे सर्व नागरिकांनी पालन करुन पोलीस प्रशासना ला सहकार्य करावे असे कडकडीचे आवाहन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार आणि पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

 

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या