अज्ञात वृद्धाचे शव आढळले, शिवाडौली सावंगी शेतशीवारा तील घटना | अज्ञात वृद्धाचे शव आढळले, शिवाडौली सावंगी शेतशीवारा तील घटना | Dead body of unknown old man found, incident in Shivadauli Sawangi Shetshiwara
पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत मौजा शिवाडौली
सावंगी शिवा रात श्री उमाकांत शंकर
कोलते रा. शिवाडौली यांच्या शेतात एका अज्ञात वृद्धाचे शव आढळुन आल्याने
परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहीती नुसार दिनांक 21/02/2O24 ला अरोली पोलीस स्टेशनचे थानेदार निशिकांत
फुलेकर यांना अज्ञात इसमाचे प्रेत पडून असल्याची माहीती मिळताच त्यांनी पोलीस
दलासह घटनास्थळ गाठले.
त्यांना एका अज्ञात वृद्धाचे शव पडलेले आढळुन
आले. शवाचा पंचनामा केला असता वृद्धाचे वय अंदाजे 70 ते 75 वर्ष असुन उंची 5
फुट 4 इंच, रंग
सावळा, बांधा सळपातळ, डोक्यावरील केस पांढरे, दाढी मीशी पांढरी
बारीक, अंगामध्ये निळ्या रंगाची टि शर्ट तसेच निळ्या
रंगाची चौकटी लुंगी व काळ्या रंगाची अंडरवेअर घातलेला आहे अशा वर्णनाचा इसम आढळून
आला.
अशा अनोळखी वर्णनाच्या
इसमाचे शव मौदा येथील ग्रामिण रुग्नालयाच्या शितगृहात
ठेवण्यात आले आहे
फिर्यादी पोलीस पाटील मौजा शिवाडौली येथील
चंद्रकांत शिवशंकर शेंडे यांच्या तोंडी बयानावरून पोलीस स्टेशन अरोली येथे गुन्हा
नोंद केला असुन अरोली पोलीस स्टेशनचे थानेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री निशांत
फुलेकर यांनी नागरिकांना अपिल केली आहे की वर वर्णन केलेल्या इसमाच्या
नातेवाईकांचे नाव व पत्ता मिळुन आल्यास त्यांनी मो. क्र.7588564300 वर सपर्क करावा. तसेच पोलीस
उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवाने यांचा मो.न.8208544268 या वर
संपर्क करावा किंवा पोलीस हवालदार दत्ता बगमारे मो. न. 7030109964 वर संपर्क करावा.
प्रतिनिधी: हर्षपाल मेश्राम, रामटेक
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time