राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते
पारशिवनी :- येथिल हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी येथिल पटांगणा मध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हिम्मत राठोड उपनिरीक्षक पारशिवनी पोलीस स्टेशन, अध्यक्ष शेषराव वानखेडे सर मुख्याध्यापक हरिहर विद्यालय तर राठोड यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी जानेवारी मध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहयाचे आयोजन पुर्ण भारता मध्ये केले जाते ते या करीता की प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत हे थांबण्या करीता राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह यांचे आयोजन करण्यात येते पण यांचे मुख्य कारण आजची युवा पिढी असुन या मध्ये आठवी ते बारावी चे विद्यार्थी खास जबाबदार असुन सडक अपघातात शाळेमध्ये शिकणारी युवा युवती ' राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह ' रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय प्रतेक वर्षी जानेवारी मध्ये करीत असते उदिष्ट रस्ते रस्ते सुरक्षा पध्दतीना प्रोत्साहन देणे आणि लोकांना तसेच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबद जागुती निर्माण करणे आहे.
या शब्दातुन लोकांना रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जबाबदारी घेण्याबाबत शिक्षित करणे तसेच प्रशिक्षण दिले जाते. हे करित असताना युवकांनी जे अठरा वर्षांच्या आत मध्ये आहेत त्यानी कोणत्याही प्रकारची वाहणे चालवु नये.कारण की असे केले तर त्यांच्या वरती व पालकांनवर दंड आकारला जातो. आणि त्यांना जेल , कारावास सुध्दा होऊ शकते अशी उपनिरीक्षक राठोड यांनी मुलांना दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वानखेडे सर मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबद योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की आज विद्यार्थी शाळेत किंवा इतर ठिकाणी जाताना तीन- तीन व्यक्ती जातात त्यामुळे अपघात होतात तसेच आजची युवा पिढी टू व्हीलर वरती स्टंट मारतात व जख्मी होतात त्यामध्ये आर्थिक, शारीरिक, मानसिक हानी होत असते ती होऊ नये म्हणून अगोदरच काळ्जी घेणे आवश्यक आहे.
तसेच राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मध्ये वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पणे नियमांचे पालन करुन आपले व इतरांचे जिव सुरक्षीत राहील याचा विचार करून आपण त्याचे पालन करावे असे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केले सुत्रसंचलन ताराचंद चव्हाण यांनी केले . कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे इन्चार्ज रामटेके, मोहोळ,ढोपरे, मस्के,जामगडे,इटकीकर,बललीगवार,सौ.गोमकाळे,सौ.ठाकरे, तसेच शाळेतील विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते. त्यांनी हा कार्यक्रम अतिशय शांत मनाने ऐकुन घेतला व त्यावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time