बिबट्याचा हल्यात ६ बकऱ्या आणि २ कोंबड्या ठार |6 goats and 2 chickens killed in leopard attack


बिबट्याचा हल्यात ६ बकऱ्या आणि २ कोंबड्या ठार

काळापाठा येथील घटना , शेतकऱ्यां मध्ये दहशतीचे वातावरण 

कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील काळापाठा येथे गोट फाॅम मध्ये घुसुन बिबट्याने बकऱ्या आणि कोंबड्या ला ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

मागील काही दिवसान पासुन पारशिवनी तालुक्यात वाघाने आणि बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला असुन शेतकऱ्यांचा पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे . रविवार आणि सोमवार ला पहाटे तीन वाजता च्या दरम्यान काळापाठा येथील रहिवासी शेतकरी मिलिंद धनिराम शेंडे यांचा गोट फाॅम मध्ये घुसुन बिबट्याने तीन मोठी बकरी , एक मोठा बकरा , दोन लहान बकरे आणि दोन कोंबळी ला ठार करून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . 

सदर घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकार्यांना माहिती मिळताच अधिकारी सतिश वासनिक आपल्या कर्मचाऱ्या सोबत घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करुन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत झालेल्या पाळीव प्राण्यांचे शवविच्छेदन केले . सतत वाढत असलेल्या वाघाचा आणि बिबट्याचा हल्यामुळे शेतकऱ्यां मध्ये आणि नागरिकांन मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असुन वनविभाच्या अधिकार्यांनी तातडीने बंदोबस्त करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळुन द्यावा अशी मागणी आता नागरिकांच्या चर्चेतुन जोर धरु लागली आहे .

बिबट्याचा हल्यात ६ बकऱ्या आणि २ कोंबड्या ठार |6 goats and 2 chickens killed in leopard attack

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या