केरडी फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात | A terrible accident involving two cars near Kerdi Phata


केरडी फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात | 
A terrible accident involving two cars near Kerdi Phata

 

महिला वकिला सह दोन गंभीर जख्मी , महामार्ग पोलीसांनी वाचविले जख्मींचे प्राण


कन्हान : - नागपुर - जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग वरील केरडी फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघातात महिला वकिला सह दोन गंभीर जख्मी झाल्याने महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन यांचे प्राण वाचविले .


महामार्ग पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार बुधवार (दि.१०) एप्रिल ला दुपारी च्या दरम्यान आमदार आशिष जयस्वाल यांची कार क्रमांक एम एच ४० बीटी १७१७ चा चालक मनोज गोतमारे हा त्यांचे स्वीय सहाय्यक पुरूषोत्तम मेश्राम यांना घेऊन रामटेक येथुन कन्हान कडे येत होता . केरडी फाट्याजवळ  अचानक दुचाकी वाहन आडवी आल्याने त्यांना वाचविण्याकरिता आशिष जयस्वाल यांचा वाहन चालकाने आपले वाहन नागपूर ते जबलपूर लेन कडे घेतली असता नागपूर वरुन रामटेक कडे जाणाऱ्या कार क्रमांक एम एच ३६ झेड ८१८३ चालकाने जोरदार धडक मारली . या भीषण अपघातात दोन्ही वाहनाचा पुढचा भाग चेंदामेंदा होऊन कार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यात सरकारी वकील अॅड.मनिषा राऊत , आशिक जयस्वाल यांचे स्वीय सहाय्यक पुरूषोत्तम मेश्राम आणि एक अन्य असे तीन लोक गंभीर जख्मी झाल्याची माहिती महामार्ग पोलीसांनी दिली . 


सदर घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन सेलोकर  , पोहवा दिनेश माकरवार , पोना आकाश राजणे सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन जख्मींना पुढील उपचारा करिता नागपुर येथे खाजगी रुग्णालयात भर्ती केले . टोल नाका कर्मचारी यांचा मदतीने दोन्ही वाहन बाजूला करून महामार्ग पोलीसांनी वाहतूक सुरळीत केला.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या