रामधाम मनसर येथे एकाच वेळेस 75 नवरदेव नवरीच्या लगनाचा सोहळा


रामधाम मनसर येथे एकाच वेळेस  75-नवरदेव नवरीच्या लगनाचा  सोहळा 



नागपूर जिल्ह्यातील मनसर येथील प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते.


यात गोर-गरीब वर-वधूचे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येते.   या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था,  नागपूर.   तसेच  महिला व बाल विकास विभाग,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या मदतीने लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात येते


सन 2005  पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पाडल्या जाते.      


      आतापर्यंत सुमारे 1266  जोडप्यांचे 'शुभमंगलम सावधान' रामधाम येथे झाले आहे.  यावर्षी 75  गरीब वर-वधूचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले. 


जिल्हा परिषद शाळेतून सर्व 75 नवरदेवांना ट्रेलरवर बसवून डी.जे,बँड,आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत गाजत त्यांची सामूहिकरित्या वरात काढण्यात आली  . हिंदु, बौद्ध व आदिवासी समाजाच्या रितिरिवाजाने 75  जोडप्यांचे शुभमंगलम सावधान संपन्न झाले.


यावेळी प्रामुख्याने माजी मंत्री सुनीलबाबू केदार .  माजी आमदार रमेशचंद्र बंग , जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकोड्डे,   एस क्यू जमा , हुकूमचंद्र आमधरे ,      रश्मी बर्वे,    विशाल बरबटे,       दयाराम रॉय ,  शांताताई कुमरे,   ज्योतीताई उमरे ,  अशोक चिखले,   दुर्गाताई सर्यांम,   योगेश रंगारी,    कलाताई ठाकरे , गौरव चौकसे,    नवीन चौकसे,   देविदास जामदार,    ऋषिकेश किंमतकर ,   हेमंत जैन,    हेमराज चोखाद्रे,   डॉ .इरफान अहमद,      कैलास नरुले ,   यांच्यासह मोठ्या खंख्येने पदाधिकारी तथा वर -वधु  कडील रिस्तेदार उपस्थीत होते .


पुढाकार 24 न्युज  करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या