घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी साढे तीन लाखांचा मुद्देमाल केला लंपास

घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी साढे तीन लाखांचा मुद्देमाल केला लंपास

 परिसरात भीतीचे वातावरण, पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

कन्हान - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत संताजी नगर कांद्री येथे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन साढे तीन लाख रूपयांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने पोलीसांनी फिर्यादी सुनिता यादव यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार (दि.१७) ऑगस्ट ला सकाळी ११ वाजता ग.भा सुनिता सुरेश यादव वय ४४ वर्ष रा. संताजी नगर कांद्री हया आपल्या दोन्ही मुला सोबत भाऊ जितेंद्र यादव च्या वाढदिवसाकरिता आपल्या माहेरी कोळसा खदान नं.६ येथे गेली. दोन्ही मुलांना त्यांची अँक्टीवा दुचाकी कामठी येथे सव्हिसींग ला टाकायची असल्याने ते दुपारी २ वाजता राहते घरी संताजी नगर येथे कारने गेले व लगेच घरुन अँक्टीवा दुचाकी सोबत घेवुन कामठी ला गेले.

तेथे दुचाकी देऊन २.२५ वाजता दरम्यान घरी परत आले. दुचाकी ची सर्व्हिसींग झाल्याने मुले गाडी घेण्यास कामठी येथे सायंकाळी ६.३० वाजता गेले. तेव्हा सुनिता यांचा मुलांनी घराचा दरवाजा व गेटला लॉक लावुन गेले व गाडी घेऊन परत ८.३० वाजता दरम्यान घरी आले. तेव्हा गेट ला लाँक नव्हता व कळी लावुन होती. मुलांनी आत प्रवेश केला असता घराला सुध्दा लॉक लावलेला नव्हता व दाराची कळी लागलेली होती.

घराच्या आत प्रवेश केला असता हॉल मधिल लोंखडी बॉक्स बेडवर सामान पसरलेले दिसले व बेटचा बॉक्स उघड्या अवस्थेत दिसला. उजव्या हाता वरील बेडरुम बघितले असता तेथील अलमारी उघडी असुन त्यातील सामान अस्थवेस्थ दिसले. तेव्हा मुलांनी आपली आई सुनिता यांना फोन व्दारे घटना झाल्याचे सांगितले.

सुनिता घरी आल्यावर लग्नाचे जुने सोन्याचे दागिने अलमारीत बघितले असता १) तीन तोळ्याचा लग्नाचा हार अं. कि. ७५,००० रु, २) एक तोड़ा साधा हार अं.कि.२५,००० रु, ३) तीन तोळे मंगलसुत्र अं.कि. ७५,००० रु, ४) लहान ३ अंगठी वजन दिड तोळे. कि.१५,००० रु, ५) एक तोळे जेन्टस् अंगठी अ. कि. २५,००० रु, ६) ५ ग्रँम बिंदीया अं. कि.१२,००० रु, ७) दोन ग्रॅम नथ अं. कि.५,००० रु, ८) आठ ग्रॅम कानाचे झुमके अं. कि.२०,००० रू, ९) पाच ग्रॅम कानाचे बाली अं. कि.१२,५०० रु, १०) चार ग्रॅम कानाची वेल अं.कि. ८००० रु, ११) चार ग्रॅम डोरल मनी मंगलसुत्र अं.कि. १०,००० रु, १२) पाच ग्रॅम चैन अं कि.१२,५०० रू, १३) डी.व्ही.आर कि. ३,००० रु, १४) आठ तोड्याची चांदीची पायजप अं. कि. ३०,००० रु, १५) आलमारी मध्ये ठेवलेले नगदी ३०,००० रु असा एकुण ३,५८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला. या घटनेने परिसरातील नागरिकांन मध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी ग.भा.सुनिता यादव यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ५३४ २३ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.

कन्हान प्रतिनिधि - ॠषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या