पती ने पत्नीची केली निर्घृण हत्या | कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी येथील घटना | Patine patnichi keli nirghun Hatya | kanhan-tekadi yethil Ghatna |

दुलेश्वरी रामकृष्ण देवगडे वय २५ वर्ष 

ब्रेकिंग न्यूज 

पती ने पत्नीची केली निर्घृण हत्या | कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी महाजन नगर येथिल घटना | The husband killed his wife by stabbing her with a knife |

आरोपी अटक, कन्हान पोलीस, घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरु 

पती ने पत्नीची केली निर्घृण हत्या | कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी येथील घटना |  Patine patnichi keli nirghun Hatya | kanhan-tekadi yethil Ghatna |

 कन्हान - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी महाजन नगर येथे भरदिवसा पती ने पत्नीचा गळ्यावर चाकु ने भोसकून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली आहे.

 

प्राप्त झालेल्या माहिती नुसार टेकाडी कोळसा खाण महाजन नगर येथे राहणारा आरोपी अमित नारायण भोयर वय २८ वर्ष याचा कामठी येथील दुलेश्वरी रामकृष्ण देवगडे वय २५ वर्ष हिच्यासोबत २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला होता. लग्ना च्या काही महिन्या नंतर दोघां मध्ये भांडणे सुरू झाली. रोज च्या भांडणाला कंटाळून आरोपी अमित भोयर ने आज मंगळवार दिनांक ३१ आॅक्टोंबर ला सकाळी ९ ते ९:३० वाजता च्या दरम्यान घरात ठेवलेल्या चाकू ने मयतेच्या गळ्यावर सपासप वार करून तिची निघृण हत्या केली आणि कन्हान पोलीस स्टेशन ला जाऊन आत्मसमर्पण केले.

आरोपी: अमित नारायण भोयर वय २८ वर्ष 


सदर घटनेची माहिती कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांना मिळताच त्यांनी स्टाॅपसह घटनास्थळी पोहचुन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. सदर घटना गंभीर्याने घेत नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांनी घटनास्थळी भेट देऊन उचित कार्यवाही चे निर्देश दिले. घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

पती ने पत्नीची केली निर्घृण हत्या | कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी येथील घटना |  Patine patnichi keli nirghun Hatya | kanhan-tekadi yethil Ghatna |



 

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या