वराडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन


वराडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि भव्य आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन 


कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील वराडा येथे नव बौद्ध पंच कमेटी वराडा द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ व्या जन्मोत्सव निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .


आज शनिवार (दि.१३) एप्रिल ला सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करुन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येईल . त्यानंतर बुद्ध धम्म संघ प्रचार मैत्री संघ यांचा प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .


रविवार (दि.१४) एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती च्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात येईल . त्यानंतर भव्य आरोग्य रोगनिदान शिबीरात अरिहंत मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथील डॉ.रजत जैन यांच्या चमुंच्या सहकार्याने नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल . महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल . या दोन दिवसीय कार्यक्रमात गावातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आव्हाहन आयोजक नव बौद्ध पंच कमेटी वराडा यांनी केले आहे .


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष आणि युवा पत्रकार ऋषभ बावनकर , उमेश मेश्राम , अक्षय मेश्राम , हर्षल नेवारे , राहुल खोब्रागडे , संजय मेश्राम , अक्षय सोमकुवर , रोशन जामदार , शुभम मेश्राम , मिथुन सोमकुवर , अरविंद मेश्राम , सावन पाटील , शिवदास डोंगरे , खुशाल पाटील , नरेंद्र गजभिए , प्रवीण पाटील , लिलाधर पाटील सह आदि गावकरी नागरिक सहकार्य करीत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या