कन्हान शहरात मेट्रो रेल्वेचा कारखान्या सह मोठे उद्योग स्थापन करण्याची मागणी | Demand for establishment of big industry including metro rail factory in Kanhan city


कन्हान शहरात मेट्रो रेल्वेचा कारखान्या सह मोठे उद्योग स्थापन करण्याची मागणी | Demand for establishment of big industry including metro rail factory in Kanhan city


भाजपा कन्हान शहर महामंत्री निलकंठ मस्के यांचे नमो अँपवर निवेदन. 


कन्हान : - नागपुर व रामटेक लोकसभा प्रचार सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हयाना कन्हान शहरात मेट्रो रेल्वेच्या बोगी निर्माण करण्याचा कारखान्या सह मोठे उद्योग स्थापन करण्याची मागणी भाजपा कन्हान शहर महामंत्री निलकंठ मस्के यांनी नमो अँपवर मा.मोदीजींना केली आहे .


बुधवार (दि.१०) एप्रिल २०२४ ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नागपुर व रामटेक लोकसभा निवडणुक प्रचार सभेकरिता कन्हान येथील बंद ब्रुक ब्रॉंड कंपनीच्या प्रागंणात आल्याने भाजपा कन्हान शहर व्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी च्या रामटेक पावन भूमीत चरण स्पर्श करून कन्हान शहराला धन्य केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले . पुर्वी औद्योगिक क्षेत्र असुन येथिल ब्रुक ब्रॉंड कंपनी , खंडेलवाल टुब & अँलाय कंपनी , तेजाब कंपनी , हिंदुस्थान पँकर्स कंपनी बंद झाल्याने शहरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे . 

कन्हान शहर रामटेक विधान सभेचे प्रवेश व्दार असुन येथे बारा महिने वाहणारी कन्हान नदी , राष्ट्रीय चारपदरी महामार्ग , नागपुर हावडा रेल्वे मार्गावर कन्हान रेल्वे जँक्शन आहे . येथे फक्त तीन वे कोलि कोळसा खुली खदान आहे . रामटेक लोकसभा क्षेत्रा अंतर्गत कोराडी , खापरखेडा विधृत निर्मिती केंद्र आणि मौदा येथे एनटीपीसी चा पॉवर प्लांट आहे . पेंच व गोसीखुर्द धरणाचे पाणी आहे . भिलाईचा स्टील प्लांट आहे . 

नागपुर मध्ये लोजिस्टिक पार्क तसेच नागपुर येथे संपुर्ण भारताला जोडणारे विमान सेवेचे विमानतळ आहे . सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी असल्याने मोठे उद्योग स्थापन करण्यास सर्व महत्वाचे साधन , संसाधन येथे उपलब्ध असल्याने येथे मेट्रो रेल्वे च्या बोगी निर्माण करण्याचा कारखान्या सह मोठे उद्योग सुरू केल्याने या परिसराचा विकास होऊ शकतो . आणि लाखो बेरोजगार युवक , नागरिकांना रोजगार प्राप्त हो़ऊ शकतो . यास्तव कन्हान शहरा लगत मोठे उद्योग स्थापन करण्यात यावे . 

असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ला निवेदन भाजपा कन्हान शहर व्दारे महामंत्री निळकंठ नागोराव मस्के यांनी नमो अँप वर केले आहे . यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री रींकेश चवरे , तालुका उपाध्यक्ष शैलेश शेळके , शहर अध्यक्ष विनोद किरपान , महिला आघाडी अध्यक्ष सौ.सुषमा मस्के , महामंत्री सौ.प्रतिक्षा चवरे सह भाजपा कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या