मनसर च्या तरुणाची सैराट हॉटेलमध्ये गळफास घेवून आत्महत्या

 

मनसर च्या तरुणाची सैराट हॉटेलमध्ये गळफास घेवून आत्महत्या    

 

रामटेक तालुक्यातील मनसर येथील निवासी  22 वर्षीय तरुण मुकेश म्हैसुर भोंडेकर हा आपल्या प्रेयसी सोबत रामटेक - नगरधन रोडवरील हॉटेल सैराट येथे गेला तेथे भाड्याने रूम घेतली . त्या रुममध्ये दोघेही दोन तास सोबत होते .

 

दरम्यान  हॉटेलमधील खोलीतल्या पख्याला ओढनी बांधून  गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. ही घटना दिनांक 4 एफ्रील रोजी दुपारी 4 वाजता घडली असून त्यावेळी  देवलापार परिसरातील  प्रेयसी त्याच्या सोबत होती .

 

विश्वसनिय सुत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार मुकेश भोंडेकर हा आपल्या प्रेयसी सोबत हॉटेल सैराट येथे गेला . तेथे एक रूम बुक केले , त्या रुममध्ये दोघेही दोन तास सोबत होते. दरम्यान ती तरुणी बाथरूम ला जाताच तरुणाने पंख्याला ओढणी बांधुन गळफास घेवून आत्महत्या केली .

 

तरुणी परत येताच तीला तरुणाने आत्महत्या केल्याचे व बेशुद्ध असल्याचे  निदर्शनास येताच ती तरुणी फार घाबरली तीने हॉटेल मालकाकडे मदत मागितली असता त्यांनी एका खाजगी वाहनातुन त्याला उपजिल्हा रुग्नालय रामटेक येथे पोहचवले . डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले .आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असुन  पुढिल तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

 

पुढाकार समाचार 24 करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या