कन्हान - पिपरी नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार


कन्हान - पिपरी नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार

कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन 

कन्हान : - कन्हान शहर विकास मंच द्वारे कन्हान - पिपरी नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करून महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

बुधवार (दि.१) मे ला कन्हान शहर विकास मंच द्वारे महाराष्ट्र आणि कामगार दिवस निमित्य  गांधी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . 

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी अर्जुन पात्रे , प्रदीप बावने यांनी महाराष्ट्र आणि कामगार दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . 

त्यानंतर कन्हान-पिपरी नगर परिषद स्वच्छता कर्मचाऱ्यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला . शेवटी अल्पोहार वितरित करुन कार्यक्रमाची सांगता करुन महाराष्ट्र आणि कामगार दिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रदीप बावने यांनी तर आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक प्रभाकर रुंघे , प्रदीप बावने , अर्जुन पात्रे , माहेर इंचुलकर , उमेश मेश्राम , अक्षय मेश्राम , हर्षल नेवारे , शुभम नागमोते , नितिन मेश्राम सह आदि सदस्यांनी सहकार्य केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या