ट्रक च्या धडकेत वाहनाचे नुकसान


ट्रक च्या धडकेत वाहनाचे नुकसान


तात्काळ अपघात स्थळी पोहचले महामार्ग पोलीस , वाहतुक केला सुरसळीत , पोलीसात गुन्हा दाखल 


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाक्या जवळ मागुन येणाऱ्या ट्रक ने मारोती बोलेनो चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुठलीही जीवीत हानी झाली नसुन कार चे नुकसान झाले . अपघाता मुळे काही वेळे करिता राष्ट्रीय महामार्गा वर मोठ्या प्रमाणात ट्राफिक विस्तळीत झाल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन वाहतुक सुरसुळीत केले .


पोलीसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार रविवार (दि.३१) मार्च ला सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान देवीदास बारसु वंजारी (वय ३८) रा.नेरी पोस्ट उनगाव कामठी हे आपल्या परिवारा सोबत नेरी येथुन कुवारा भिवसेन येथे कार्यक्रमा करिता आपल्या मारोती बोलेनो चारचाकी वाहन क्रमांक एम एच ३१ सी  क्यु ४१३३ ने नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग रोड ने निघाले होते . राष्ट्रीय महामार्गा ने जात असतांना बोरडा टोल नाक्या जवळ मागुण येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ४० बी जी ६९६३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन मागुन मारोती बोलेनो चारचाकी वाहना ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुठलीही जीवीत हानी झाली नसुन कार चे मोठे नुकसान झाले . सदर घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्गा पोलीसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन सेलोकर , हेड कांस्टेबल , दिनेश माकरवार , गेंदलाल वरकडे , शैलेश बिनझाडे , नापोशि आकाश राजने , पोशि राजेश रॉय , चालक मंगेश नासरे आणि कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला .अपघाता मुळे काही वेळे करिता राष्ट्रीय महामार्गा वर मोठ्या प्रमाणात ट्राफिक विस्तळीत झाल्याने  पोलीसांनी वाहतुक सुरसुळीत केले . सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी देविदास वंजारी यांचा तक्रारी वरून आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या