सबका साथ, सबका विकास' हा आमचा मंत्र राज्यघटनेचा खरा आत्मा-पंतप्रधान नरेंद्र मोदी | Sabka Saath, Sabka Vikas' is our mantra, the true soul of the Constitution - Prime Minister Narendra Modi |


सबका साथ, सबका विकास' हा आमचा मंत्र राज्यघटनेचा खरा आत्मा-पंतप्रधान नरेंद्र मोदी


'एक देश,एक राज्यघटना' हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण केले - 


ही निवडणुक पुढील एक हजार वर्षाच्या विकास आणि संपन्नतेची पायभरणी , विरोधकांवर जोरदार हल्लाबोल


कन्हान : - नागपुर मतदान संघातील महायुती चे उम्मेदवार नितिन गडकरी  आणि रामटेक मतदान संघातील महायुती चे उम्मेदवार राजु पारवे यांचा प्रचारार्थ कन्हान येथे बुधवारी ब्रुक बाॅन्ड कंपनी परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा संपन्न झाली . पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर येताच उपस्थितांनी मोदी , मोदी अश्या घोषणा दिल्या . सभेत लाखोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातुन केंद्रातील एनडीए सरकार ने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगितला . 


इंडिया आघाडीतील नेते नागरिकांना मुर्ख बनवित आहेत असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना काॅग्रेस ने सत्तर वर्षात संपुर्ण भारतात कधीच लागु केली नाही . घटनेतील ३७० कलमामुळे जम्मू कश्मीर मध्ये राज्यघटनेचा तरतुदी लागु होत नव्हत्या . तेथील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना इतर भारतात मिळणाऱ्या आणि सवलतीपासुन वंचित राहावे लागत होते . पण नागरिकांना मध्ये भेदभाव करणारे ३७० कलम आम्ही हठविले आणि एक देश , एक राज्यघटना हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले .


तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएम , लोकशाहीबाबत आणि अनेक मुद्यावरुन होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले . ते म्हणाले, कि "१९ एप्रिल रोजी आम्हाला खासदार निवडून आणायचे नाही , आम्हाला भारताला पुढील हजार वर्षांसाठी मजबूत करण्यासाठी मतदान करायचे आहे."सबका साथ, सबका विकास' हा आमचा मंत्र राज्यघटनेचा खरा आत्मा आहे . मात्र घराणेशाहीच्या पक्षांनी संविधानाच्या या भावनेचा नेहमीच अपमान केला. सामाजिक न्यायाबाबत खोटे बोलून हे लोक स्वतःच्या कुटुंबाला प्रोत्साहन देत राहिले अशी विरोधकांवर सडकून टिका केली . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विकासकामांची हमी देऊन नागरिकांना रामटेक , नागपूर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे यावेळी आव्हान केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या